न्यूयॉर्क : इलॉन मस्क (Elon Musk) आता ट्विटरचे (Twitter) नवे मालक बनले आहेत. सोशल मीडिया कंपनी ट्विटरची सूत्रे हाती घेताच त्यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह चार उच्च अधिकाऱ्यांना हटवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पराग अग्रवाल ट्विटरमधून रिकाम्या हाताने बाहेर पडणार नाहीत. मोठी रक्कम त्यांच्या हातात येणार आहे. कराराचा एक भाग म्हणून, पराग यांना बेस सॅलरी आणि इक्विटी अवॉर्ड्सच्या एक्सीलेरेटेड वेस्टिंग आधारावर 345 अंदाज लावण्यात आला आहे.
रिसर्च फर्म Equilar च्या मते, पराग अग्रवाला यांना मिळणारी रक्कम अंदाजे 4.2 कोटी डॉलर म्हणजेच 345 कोटींहून अधिक असेल. ट्विटरच्या प्रॉक्सीनुसार, पराग अग्रवाल यांची एकूण भरपाई 2021 मध्ये 3.04 कोटी डॉलर होती, जेव्हा ते चीफ टेक्निकल ऑफिसर होते. CEO म्हणून अग्रवाल यांचा पगार वार्षिक 1 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 9.24 कोटी असल्याचे नोंदवले गेले. त्यांना कंपनीकडून वार्षिक एक मिलियन डॉलरचं पॅकेज आणि बोनस देण्यात येत होता. बोनसशिवाय पराग यांना 12.5 मिलियन रिस्ट्रिक्टेड स्टॉक युनिटही दिले होते. (Latest News Update)
कंपनीचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर पराग यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), बॉम्बे आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेल्या अग्रवाल यांनी एक दशकापूर्वी ट्विटरवर नोकरी सुरू केली. त्यावेळी कंपनीत 1000 पेक्षा कमी कर्मचारी होते.
इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द केल्याची घोषणा केल्यानंतरही पराग अग्रवाल उघडपणे समोर आले होते आणि त्यांनी मस्क यांच्यावर हल्लाबोल केला होता. दुसरीकडे, ट्विटरचे नवे बॉस बनलेले इलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट खात्यांच्या संख्येबद्दल पराग अग्रवाल यांच्यासह ट्विटरच्या इतर वरिष्ठ अधिकारी आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.