Breaking: सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे 'कॅप्टन'; सुत्रांची माहिती Saam TV
देश विदेश

Breaking: सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे 'कॅप्टन'; सुत्रांची माहिती

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

वृत्तसंस्था

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधीलच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण याबाबत चर्चा सुरु होती. AICC च्या झालेल्या बैठकीत सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावावर पुढे करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजून अधिकृत घोषणा बाकी आहे. पंजाब काँग्रेसच्या (Panjab Congress) भांडणात, काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांना हटवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या कार्यवाहक राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना हटवण्याची तयारी सुरू होती. राजीनाम दिल्यानंतर पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला कॅप्टन अमरिंदर सिंग अनुपस्थित राहिले होते.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून राजीनाम देण्याची इच्छा व्यक्त केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याशीही त्यांनी बोलणी केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, अशीही चर्चा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदावरून काढून टाकल्यास काँग्रेस सोडण्याची धमकीही दिली आहे. बातम्या येत आहेत की त्यांनी हायकमांडला सांगितले आहे की जर पक्षाचा हा त्रास संपला नाही तर ते पक्षही सोडतील.

अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेता आणि हरियाणा सरकारचे मंत्री अनिल वीज यांनी ट्विट करत म्हणाले ''कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा म्हणजे, नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच दिवशी त्याची स्क्रिप्ट लिहिली गेली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Pune News: अंगावर घसरगुंडी कोसळून चिमुकलीचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर सोडले प्राण; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाला अटक झाल्याच्या दिवशीच, पत्नीच्या नावावर जमीन; व्यवहारावर संशय

SCROLL FOR NEXT