Pandharpur to london wari Saam tv
देश विदेश

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Pandharpur to london wari update : पंढरीची वारी लंडनला पोहोचली. 70 दिवसांत विठुरायाची वारी लंडनला पोहोचली.

डॉ. माधव सावरगावे

पंढरपूरहून विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुका घेऊनपंढरीची वारी थेट लंडनच्या दारी पोहोचली. लंडन येथे राहाणारे अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने पंढरपूर ते लंडन ही वारी निघाली. भारतातील लंडन येथे राहणाऱ्या जनसमुदायाने 14 एप्रिल रोजी पंढरपुरातून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडनवारी सुरू केली. ही वारी 70 दिवसांचा प्रवास करत आशिया आणि युरोप या दोन खंड ओलांडून 22 देशांतून प्रवास केला.

२३ देशांच्या प्रवासानंतर पांडुररंगाच्या पादुका 22 जून 2025 लंडनमध्ये पोहोचल्या. लंडनच्या टॉवर ब्रिजजवळ येथील भारतीयांनी या वारीचे परंपरेने जोरदार स्वागत झाले. यावेळी हरिनामाचा जयघोष करण्यात आला. लंडनमध्ये टॉवर ब्रिजजवळ ढोल पथक आणि भगवी पताका घेऊन असलेले वारकरी यावेळी पाहायला मिळाले. या वारीमध्ये येथे आषाढी एकादशीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

विठुरायाचे वारकरी साता समुद्रापार लंडनमध्ये आषाढी एकादशी साजरी करणार आहेत. आज एकीकडे महाराष्ट्रात वारीचा जयघोष सुरू असताना लंडनमध्ये देखील विठू नामाचा गजर घुमला. पंढरीच्या वारीचे वातावरण लंडनमध्ये राहाणाऱ्या मराठी माणसाला या निमित्ताने अनुभवता येत आहे.

चक्क तांदळावर साकारलं विठू माऊलीचं चित्र

आज रविवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोल्हापूरातील कसबा बावडा परिसरात राहणाऱ्या मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी चक्क तांदळावर विठू माऊलींचे चित्र साकारलं. अशांत मोरे हे दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आषाढीनिमित्त कलाकृती सादर करत असतात. यंदा त्यांनी चक्क तांदळावरच विठू माऊलींचे आकर्षक चित्र काढून आपली कला विठुरायाच्या चरणी अर्पण केलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Tips: अंथरूणातून उठल्यानंतर या सवयी पाळा, भविष्यात होईल फायदा

WTC Points Table: भारताच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; पाहा भारत कोणत्या स्थानावर?

Maharashtra Live News Update : विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा असलेल्या भाविकाला सुरक्षा रक्षकाची काठीने बेदम मारहाण

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवा, जाणून घ्या महत्वाच्या सोप्या टिप्स

Ladki Bahin Yojana: वेळेवर ₹१५०० मिळत नाहीत, लाडकी बहीण योजना बंद करा, राज्यातील महिलांची मागणी

SCROLL FOR NEXT