Palghar Sailor  Saam tv
देश विदेश

Palghar Sailor : पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय खलाशाचा मृत्यू; भारतात सव्वा महिन्यांनी मृतदेह आणणार, काय आहे प्रकरण?

Palghar Dahanu Sailor dies : पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त भारतीय खलाशी विनोद लक्ष्मण कोल यांचा १७ मार्चला मृत्यू झाला. विनोद हे पालघरच्या डहाणू येथे राहायला होते.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त भारतीय खलाशी विनोद लक्ष्मण कोल यांचा १७ मार्चला मृत्यू झाला. विनोद हे पालघरच्या डहाणू येथे राहायला होते. डहाणूतील त्यांच्या गावातील लोकांना विनोद परतेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांची दीड महिन्यापूर्वी प्राणज्योत मालवली. पाकिस्तान विनोद कोल यांचा मृतदेह तब्बल दीड महिन्यांनी भारतात पाठवणार आहे.

पाकिस्तानने भारतीय सांगरी नियंत्रण रेषा ओलांडलेल्या जहाजामधील विनोदला जेरबंद केलं. जहाजावर काम करणाऱ्या खलाशी विनोद यांना दोन महिन्यापूर्वी पाकिस्तानने ताब्यात घेतलं. मीडिया रिपोर्टनुसार, ८ मार्चला आंघोळ करताना लक्ष्ण यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांचा १७ मार्च रोजी मृत्यू झाल्याचे इतर कैद्यांना सांगितले. या घटनेनंतर जेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला संपर्क साधून विनोद यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली.

या घटनेनंतर विनोद यांच्या कुटुंबाने स्थानिक आमदाराच्या मदतीने पाकिस्तानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पुढे या प्रकरणी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी मदतीने पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह भारतात पाठविण्यास तयार झाले.

पाकिस्तानमधील भारतीय कैद्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी जतीन देसाई यांनी म्हटलं की, 'भारत सरकारला भारतीय कैद्याच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे. यानंतर विनोद यांचं नाव महाराष्ट्राच्या कैदीच्या यादीत मिळालं'.

35 भारतीय खलाशांची सुटका

तत्पूर्वी, भारतीय सांगरी नियंत्रण रेषा ओलांडून गेलेल्या १८३ कैद्यांपैकी ३५ कैद्यांची सुटका ३० एप्रिल रोजी होणार आहे. यामध्ये डहाणूमधील ५ खलाशांचा समावेश आहे. हे खलाशी डहाणूमध्ये २-३ मेपर्यंत घरी पोहोचण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचला विश्वास कुमार, पण मानसिक धक्क्याने हदरला

Itchy Nose Relief: नाकात वारंवार खाज येते? 'या' उपायांनी घरच्या घरी सहज आराम मिळवा

Skin Care: मेकअपशिवाय मिळवा नेचरल पिंक ग्लो, फोलॉ करा या टिप्स

Food Infection: फूड पॉइजनिंगची लक्षणं कोणती? तब्येत बिघडल्यावर कशी काळजी घ्याल?

Sambhaji brigade : गायकवाडांना एकट्यात गाठून हल्ला करणे नामर्दाची #@&^%; काळं फासल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, भाजपवर केला गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT