दिल्लीत पाकिस्तानी अतिरेकी सापडला; AK-47, हँडग्रेनेड जप्त
दिल्लीत पाकिस्तानी अतिरेकी सापडला; AK-47, हँडग्रेनेड जप्त Saam Tv
देश विदेश

दिल्लीत पाकिस्तानी अतिरेकी सापडला; AK-47, हँडग्रेनेड जप्त

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दिल्लीच्या Delhi लक्ष्मी नगर येथून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला Pakistani terrorist अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून एके -47 असॉल्ट रायफल, हँड ग्रेनेडसह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या अटक करण्यात आलेल्या दहशवाद्यची ओळख पटली असून त्याचे नाव मोहम्मद असरफ आहे. तर तो पाकिस्तानच्या पंजाबचा रहिवासी आहे.

"दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने लक्ष्मी नगरच्या रमेश पार्क येथून पाकिस्तानी नागरिकत्वाच्या Pakistani Nationality एका दहशतवाद्याला अटक केली आहे. तो भारतीय नागरिकाच्या बनावट ओळखपत्रासह राहत होता. एक एके -47 असॉल्ट रायफल, एक अतिरिक्त पत्रिका आणि 60 राऊंड, एक हातबॉम्ब, 2 अत्याधुनिक 50 राऊंडसह पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. अशी माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

तर, लक्ष्मी नगरमधील रमेश पार्क येथील त्याच्या सध्याच्या पत्त्यावर पोलिसांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

सणासुदीच्या काळात, दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्या बैठकीत दहशतवादविरोधी उपायांवर चर्चा केल्यानंतर तीन दिवसांनी ही घटना घडली आहे. तर 9 ऑक्टोबर रोजी त्यांनी दहशतवाद्यांना स्थानिकांचा आधार घेण्यापासून कसे रोखता येईल यावर पोलिसांनी बैठकीत चर्चा केली होती.

तर एक दिवसापूर्वीच जम्मू-काश्मीरच्या Shopian जिल्ह्यात चकमकीदरम्यान लष्कर-ए-तैयबा (एलईटी)/द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चे तीन दहशतवादी ठार झाले होते. पोलिसांनी माहिती दिली की, त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा आणि इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

SCROLL FOR NEXT