Rabia Ahsan death news : पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या महिला अँकर रबिया अहसन यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. रावळपिंडी येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांना गोळी लागलेल्या अवस्थेत मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
पाकिस्तानमधील '९२ न्यूज' या लोकप्रिय वृत्तवाहिनीवर अँकर म्हणून काम करणाऱ्या रबिया अहसन (वय ४१) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालाय. रविवारी रावळपिंडी येथील त्यांच्या गुलशनबाद परिसरातील घरातील बेडरूममध्ये त्यांचा मृतदेह गोळी लागलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत रबिया यांच्या पतीला तातडीने ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान पतीने पोलिसांना सांगितले की, अपघाताने गोळी सुटल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र, पोलीस या दाव्याची कसून चौकशी करत असून जप्त करण्यात आलेले हत्यार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
रबिया अहसन यांनी शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या वाहिनीवर कार्यक्रम सादर केला होता. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे पाकिस्तानमधील पत्रकार आणि मीडिया वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सहकाऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.