Pakistani Muslim artists perform an AI-enhanced Ramayana on stage in Karachi, receiving a standing ovation and chants of 'Jai Shri Ram' from a thrilled audience. Saam Tv
देश विदेश

कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामायणाचं सादरीकरण; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला पाकिस्तान

Ramayana Echoes in Karachi: चक्कं भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानच्या कराची शहरात पाकिस्तानी कलाकारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या आहेत... मात्र त्याचं कारण काय?

Suprim Maskar

रामायणाची चर्चा आता पाकिस्तानातही सुरु आहे. कारण पाकिस्तानातील मुस्लिम कलाकारांकडून कराचीत रामलीलेचं सादरीकरण करण्यात आलयं. नेमकं प्रकरण काय? पाकिस्तानी नागरिकांनी रामलीलेला कसा प्रतिसाद दिला?

रामायणावरचं नाटक संपलं आणि प्रेक्षकांनी टाळ्याच्या एकच कडकडाट केला...रंगमंचावरील नाटकाला मिळालेला हा प्रतिसाद पाहून हे नाटक भारतातल्या एखाद्या नाट्यगृहात सादर झालं असावं असं तुम्हाला वाटत असेल.. मात्र हे रामायण सादर केलय थेट पाकिस्तानातील कराचीच्या कला परिषदेत आणि ते सादर केलय मुस्लिम कलाकारांनी

एआय तंत्रज्ञानाचा वापर करत हिंदू धर्मातील महाकाव्य असणारे रामायण पाकिस्तानातील रंगमंचावर सादर केलं गेलयं. पाकिस्तानातील 'मौज' या नाटकाच्या ग्रुपनं दिग्दर्शक योगेश्वर करेरा यांच्या दिग्दर्शनात या नाटकाची निर्मिती केलीय. नोव्हेंबर 2024 मध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. त्यानंतर कराचीत पुन्हा एकदा या नाटकानं प्रेक्षकांची मन जिंकली..

रामायण सारख्या हिंदू धार्मिक ग्रंथावर आधारित नाटक केल्याबद्दल लोक वाईट बोलतील किंवा धमक्या देतील याची मला कधीही भीती वाटली नाही. रामायणाची कथा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि मला ती प्रेक्षकांसमोर तिच्या सर्व भव्यतेसह आणि सौंदर्याने आणायची होती. मला खात्री होती की पाकिस्तानचा समाज सहिष्णु आहे आणि तो हे नाटक स्वीकारेल.

पाकिस्तानी कलाकारानी सादर केलेलं हे रामायण म्हणजे एकप्रकारे रामायणाचं जगावर असेलेलं गारूडच अधोरेखित करत. धर्म- प्रांत यांच्या सीमा ओलांडून पाकिस्तानच्या रंगभूमीवर रामायण सादर झाल्यानं भारतीयांकडूनही याचं कौतुक केलं जातंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मराठी माणसासाठी BMC निवडणूक शेवटची; राज ठाकरेंनी कोणत्या धोक्याचा इशारा दिला?

Rahul Gandhi: राहुल गांधी अ‍ॅक्शन मोडवर, बिहारमधील पराभवानंतर काँग्रेसच्या ७ बड्या नेत्यांची हकालपट्टी

अयोध्यानगरीत PM मोदींचं भव्य स्वागत होणार, 5000 महिला आरती करणार, कसं आहे ध्वजारोहण कार्यक्रमाचं वेळापत्रक?

Gauri Palve : पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला अटक; डॉ गौरी पालवेची आत्महत्या की हत्या?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

SCROLL FOR NEXT