Pakistani MP Aamir Liaquat Hussain found dead Latest News SAAM TV
देश विदेश

पाकिस्तानी खासदार मृतावस्थेत आढळले; तिसरं लग्न, तलाकमुळे होते चर्चेत

पाकिस्तानचे खासदार आमिर लियाकत हे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.

साम ब्युरो

कराची: पाकिस्तानचे (Pakistan) खासदार आमिर लियाकत यांचा कराचीमध्ये मृत्यू झाला. स्थानिक वृत्तवाहिनीने त्यांच्या नोकराच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले. कराचीमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये ते मृतावस्थेत आढळले. हृदयविकाराच्या झटक्याने आमिर लियाकत यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

आमिर लियाकत (Amir Liaqat Hussain) अलीकडेच दुसऱ्या पत्नीला तलाक आणि तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत होते. आमिर लियाकत हे ४९ वर्षांचे होते. कराचीमध्ये १९७२ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. आमिर यांचे तीन विवाह झाले होते.

दुसरी पत्नी तौबा अन्वर यांच्याशी २०१८मध्ये लग्न झाले होते. त्यांना तलाक दिल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या दानिया शाह यांच्याशी विवाह केला होता. लग्नाच्या काही दिवसांनी १८ वर्षीय दानिया यांनी तलाक मागितला होता.

आमिर लियाकत यांच्या मृत्यूचे वृत्त जियो न्यूजने अपार्टमेंटमधील नोकराच्या हवाल्याने दिले. नोकराने दिलेल्या माहितीनुसार, आमिर लियाकत यांची प्रकृती बुधवारी रात्रीपासूनच खराब होती. मात्र, रुग्णालयात जाण्यास त्यांनी नकार दिला होता.

असह्य वेदनांमुळे ते जोरात ओरडले. त्यानंतर त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, खोलीचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडल्यानंतर ते खोलीत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात नेले असता, तिथे त्यांना मृत घोषित केले.

आमिर लियाकत यांनी २०१८मध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते कराचीमधून (Karachi) खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला होता.

पीटीआयमध्ये जाण्याच्या आधी ते मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटमध्ये होते. मात्र, २०१६मध्ये त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी राजकारण सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर २०१८मध्ये ते इम्रान खान यांच्या पक्षात गेले.

कराचीमधून ते खासदार म्हणून निवडूनही आले होते. लियाकत हे मीडिया इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्षांपासून होते. २००१मध्ये ते जियो टीव्हीमध्ये रुजू झाले होते.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: कुवत किती, लायकी किती? लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, धावत्या ट्रकमधून व्हॅक्सिनचा मुद्देमाल जप्त

Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

Viral Video: अजबच! बी. एड . करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जलवा, परीक्षेला चक्क हेलिकॉप्टरने गेले

SCROLL FOR NEXT