pakistan pm x
देश विदेश

Ceasefire Breach : पाकचे शेपूट वाकडे, ३ तासांत शस्त्रसंधीचं उल्लंघन, सडेतोड उत्तर देण्याचे लष्कराला आदेश

India Pakistan ceasefire : पाकिस्तानने फक्त तीन तासांत शस्त्रसंधीचा भंग केला. जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत ड्रोन हल्ले आणि गोळीबार, भारताचा कडक इशारा आणि सडेतोड कारवाईचे आदेश.

Namdeo Kumbhar

शस्त्रसंधी झाल्यानंतर फक्त तीन तासात पाकिस्तानने विश्वासघात केला. पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यामुळे भारताने कठोर इशारा दिला आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराला कारवाई करण्याचे आणि सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानच्या विश्वासघातावर नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला.

शनिवार भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाली होती. अमेरेकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली होती. पाकिस्तानने भारताला फोन करत शस्त्रसंधीबाबत चर्चा केली होती. भारतानेही शस्त्रसंधीसाठी होकार दिला होता. पण पाकड्यांनी फक्त तीन तासांतच सीमेवर पु्न्हा गोळीबार सुरू केला. त्यामुळे भारताने पाकिस्तानला कडक इशारा दिला. त्याशिवाय शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश लष्कराला दिले आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचा बुरखा फाडला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता शस्त्रसंधी करार झाला होता. मात्र, अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने जम्मू-काश्मीर ते गुजरातपर्यंत ड्रोन हल्ले आणि गोळीबार करून कराराचा भंग केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पाकिस्तानच्या कृतीला "निंदनीय" म्हटले. त्यांनी पाकिस्तानला तत्काळ असे हल्ले थांबवण्याची आणि जबाबदारीने वागण्याची इशारा दिला.

भारतीय लष्कराला सीमेवर कोणत्याही उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने श्रीनगर, जम्मूसह अनेक ठिकाणी ड्रोन पाठवले आणि स्फोट घडवले. भारताने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय केली. यामुळे सीमेवर तणाव वाढला असून, भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT