Ministry of External Affairs Press conference 
देश विदेश

India Pakistan Tensions : पाकिस्तानकडून ३६ ठिकाणं निशाण्यावर, ४०० ड्रोनने हल्ला, धार्मिक स्थळांना टार्गेट

India-Pakistan War : भारताच्या नापाक हरकतीचा बुरखा भारतीय जवानांनी फाडला आहे. पाकिस्तानने दोन दिवसांत भारतावर ४०० ड्रोनने हल्ला केला. सर्व ड्रोन तुर्कीचे असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालायाने दिली.

Namdeo Kumbhar

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातवरण आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलेल्यानंतर बावचाळलेल्या पाकिस्तानकडून भारतावर प्रतिहल्ला केला. पण भारताने पाकड्यांचा हल्ला परतवून लावला. पाकिस्तानकडून सात आणि आठ तारखेला भारतामध्ये ३६ ठिकाणी ४०० ड्रोन द्वारे हल्ला केला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या हल्ल्याची आणि भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तराची माहिती दिली.

पाकिस्तानकडून भारताच्या धार्मिक स्थळ टार्गेट कऱण्यात आले. पुंछमधील गुरूद्वारावर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानच्या हल्ल्यात सर्वसामान्य नागरिकांचे मोठं नुकसान झालेय. पाकिस्तानकडून भारतीय नागरिकांना लक्ष केले जातेय. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात भारतामधील दोन विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे.पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने प्रत्युत्तर दाखल पाकिस्तानमध्ये हल्ला केला. पाकिस्तानकडून भारताला उकसवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

पाकिस्तानने हवाई हद्द पार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने स्वत:च्या नागरिकांना संकटात टाकले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानमध्ये चार हल्ले केले. भारताच्या ड्रोनने पाकिस्तानचे ड्रोन नष्ट केले. पाकिस्तानकडून पूंछमधील गुरूद्वारावर हल्ला करण्यात आला. भारताच्या लष्कराने संयमाने आणि जबाबदारीने पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या लष्कराकडून पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले. हे ड्रोन तुर्कीस्थानमधील असल्याचे फॉरेन्सिक चाचणीत स्पष्ट झाल्याचे परराष्ट्र मंत्रालायाने सांगितले. खोट्या बातम्या देत पाकिस्तानकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पाकिस्तानचे सर्व हल्ले भारताने हाणून पाडले.

कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, "७ व ८ मे च्या रात्री पाकिस्तानी सैन्याने पश्चिम सीमेवर अनेकदा भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली, सैन्य पायाभूत सुविधांवर हल्ल्याचा हेतू होता. नियंत्रण रेषेवर मोठ्या क्षमतेच्या शस्त्रांनी गोळीबार झाला. ३६ ठिकाणी ३००-४०० ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय सैन्याने अनेक ड्रोन पाडले. हल्ल्याचा उद्देश हवाई संरक्षण यंत्रणा तपासणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे होता. ड्रोनच्या अवशेषांचा तपास सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार, हे तुर्की असिसगार्ड सोंगार ड्रोन आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT