Pakistan positions itself as a mediator in the Middle East conflict amid global scrutiny and internal challenges. saam tv
देश विदेश

पाकची गुलामगिरी, मध्यस्थीची शिष्टाई, बिघडलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

Pakistan Steps In As Mediator In Middle East: आखाती देशातील युद्धविरामात मध्यस्थाची भूमिका निभावणारा पाकिस्तान आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतोय. कायम दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानने मध्यस्थीची शिष्टाई का केली? पाहूया एक रिपोर्ट...

Omkar Sonawane

पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तानने मध्यस्थी केली आहे. इराणने १० मागण्यांचा प्रस्ताव पाकमार्फत अमेरीकेला पाठवला आणि युद्धविरामाची घोषणा झाली. दहशतवाद पोसणारा देश म्हणून पाकची जगभरात प्रतिमा आहे. मात्र आखाती युद्धात थेट मध्यस्थाची भूमिका निभावल्याने आणि युद्ध विराम झाल्याने पाकमधील राजकीय नेते हुरळून गेले आहेत. मात्र युद्धात मध्यस्थी करणे ही अभिमानाची बाब नव्हे तर ती पाकिस्तानची अपरिहार्यता आहे.

दुसरीकडे अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ टेरीरीझम मुळे अनेक प्रगत राष्ट्र दुखावली आहेत. तसेच युद्धादरम्यान ट्रम यांचा खोटारडेपणाही वारंवार समोर आला आहे. एककल्ली आणि आपलंच मत रेटणाऱ्या ट्रम्प यांच्या मदतीला नाटो सदस्य देश पण आले नाही. युद्धात एकटा पडलेल्या आणि युद्ध गळाशी आल्याने अमेरीकेला कोणाच्या तरी मध्यस्थीची गरज होती. पाकिस्तान सारख्या छोट्या देशाची किंबुहना एका एजंटची अमेरीकेला गरज होती. मध्यस्थीसाठी पाक पुढे का सरसावला त्याची आणखी कारणे आहेत.

- दहशतवादाला पोसणारा देश अशी जगभरात पाकची प्रतिमा आहे. ही प्रतिमा सुधारून शांतीदुताची प्रतिमा निर्माण करण्यासाठी पाकने मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला.

- दुसरीकडे इराण हा शियाबहुल देश आहे. तर पाकिस्तानमध्येही शियांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अयातुल्ला खामेनींच्या मृत्यनंतर पाकमध्ये हिंसाचार उसळला. अमेरिकेच्या दबावामुळे इराण विरोधात पाकिस्तानला युद्धात उतरावे लागले असते तर पाकिस्तानात अंतर्गत मोठी फूट पडली असती.

- आधीच कंगाल आणि अराजकता माजलेल्या पाकिस्तानला युद्धाच्या मोठ्या झळा बसत आहेत. इंधन कोंडीमुळे पाकमध्ये स्थिती गंभीर आहे.

- जवळपास 55 दशलक्ष पाकिस्तानी नागरिक आखाती देशांमध्ये कामानिमित्त वास्तव्य करतात. युद्धामुळे पाकिस्तानच्या परकीय चलनावर परिणाम होत होता.

- अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमावाद शिगेला पोहोचलाय. दोन्ही देशांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. बलुचिस्तानमधील बलुच लिबरेशन आर्मीही आक्रमक झाली आहे. आखाती युद्धाच्या निमित्ताने सीमेवरील शत्रूंच्या हल्लाचा पाकला धोका आहे.

या सर्व कारणांमुळे पाकने अमेरीकेसमोर गुडघे टेकले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला काही दिवसांपूर्वी ‘दलाल’ म्हटले होते. . आता इराण-अमेरीकेच्या प्रतिनिधींची पाकमध्ये काही दिवस चर्चा सुरु राहिल. द रिअल हिरो म्हणून शरीफ आणि मुनीर यांचं कौतुक होत असलं तरी हे सगळं उसनं अवसान असल्याचं लपून राहत नाही. दहशतवाद आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या पाकने जगाच्या शांततेसाठी मध्यस्थाची भूमिका बजावणे म्हणजे खोटेपणाची हद्द आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT