Terrorists Attack Police Training Centre in Pakistan Saam
देश विदेश

Pakistan Terror Attack : पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला; ७ पोलिसांचा जागीच मृत्यू, १३ जखमी

Terrorists Attack Police Training Centre in Pakistan: खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इल्माईल खान जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात अतिरेक्यांचा मोठा हल्ला. हल्ल्यात ७ पोलीस ठार.

Bhagyashree Kamble

  • पाकिस्तानमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रावर अतिरेक्यांचा हल्ला.

  • केंद्रात अदांधुंद गोळीबार.

  • हल्ल्यात ७ ठार, १३ जखमी.

पाकिस्तानी तालिबानच्या अतिरेक्यांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माइल खान जिल्ह्यात एक मोठा हल्ला केला आहे. अतिरेक्यांनी पाकिस्तानमधील एका पोलीस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात सात पोलीस ठार झाले. तर, सुरक्षा दलांनी पाच हल्लेखोरांना ठार मारले. हा हल्ला पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धक्का मानला जात आहे.

शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, रत्ता कुलाची परिसरातील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्फोटकांनी भरलेला एक ट्रक आदळला. यामुळे स्फोट झाला. या स्फोटामुळे केंद्राच्या भिंतीचा काही भाग कोसळला. त्यात एक पोलीस कर्मचारी जागीच ठार झाला.

त्यानंतर सात ते आठ दहशतवादी पोलीस प्रशिक्षण केंद्रात घुसले. त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. हल्लेखोरांनी यावेळेस ग्रेनेड आणि इतर शस्त्रांचाही वापर केला. यावेळी २०० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यात १३ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतांमध्ये एक अधिकारी आणि इतर कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

सुरूवातीला टीटीपीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. परंतू, नंतर त्यांनी नाकारली. काही सोशल मीडिया अकांऊट्सने आयएमपीच्या नावाने जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, हा हल्ला नेमका कुणी घडवून आणला, हे अद्याप अस्पष्ट आहे. हल्लेखोरांनी बॉडी कॅमेऱ्यांचा वापर करून हल्ल्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले होते. याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT