PAKISTAN SCHOOL ROOF COLLAPSE KILLS 21 IN PESHAWAR AI image
देश विदेश

Shocking : भीषण दुर्घटना! शाळेचे छत कोसळून २९ विद्यार्थ्यांचा मृत्यू; एका शिक्षिकेचाही समावेश

Pakistan School Collapse News : पाकिस्तानच्या पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात शाळेचे छत कोसळून २९ विद्यार्थ्यांसह एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. दुर्घटनेत ४० हून अधिक जण जखमी झाले आहे.

Alisha Khedekar

  • पाकिस्तानमधील दिर कॉलनी परिसरात शाळेचे छत कोसळल्याने मोठी दुर्घटना

  • मृतांमध्ये २९ विद्यार्थी आणि एका महिला शिक्षिकेचा समावेश

  • जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले

पाकिस्तानातील पेशावर शहरात शाळेचे छत कोसळून २९ विद्यार्थी आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ४० हून अधिक जण जखमी झाले आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात ही दुर्घटना घडली. शहराचे पोलीस प्रमुख मियाँ सईद यांनी या घटनेची माहिती दिली. दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास शाळेत चालू वर्गामध्ये शाळेचे छत कोसळले. या दुर्घटनेत वर्गातील विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत २९ मृतदेह काढण्यात यश आले असून अजूनही बचाव पथकाकडून बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान २९ मृतदेहांमध्ये एका महिला शिक्षिकेचा मृतदेह सापडला आहे. तसेच इतर ४० जण जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. बचाव पथकांनी २५ जखमी मुलांना उपचारासाठी दाखल केले.

छत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली आणखी विद्यार्थी किंवा शाळेतील कर्मचारी अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथके ढिगारा हटवून अडकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रति हळहळ व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold : सोनं-चांदी खरेदीदारांसाठी खूशखबर! चांदी ८००० ने स्वस्त, सोन्याची किंमतही घसरली; पाहा आजचे दर

Supreme Court : मोठी बातमी! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, राहुल गांधींनाही फटकारले

IAS officers Transfer: पुन्हा मोठा प्रशासकीय फेरबदल, ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत एमआयडीसीच्या जलवाहिन्यांना गळती

Beauty Tips: ना शेविंग, ना थ्रेडिंग! फक्त ४ गोष्टींच्या मदतीने चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी ट्राय करा हा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT