PAKISTAN OCCUPIED KASHMIR RAWALAKOT FIRING: JAAC CLAIMS 19 PROTESTERS KILLED, INDIA REACTS  Saam Tv
देश विदेश

Rawalakot : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण ; सुरक्षा दलांच्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Rawalakot Kashmir Attack News : पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथे आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांच्या गोळीबारात १९ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानवर टीका केली असून PoKमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • रावलकोटमध्ये आंदोलनादरम्यान सुरक्षा दलांच्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाल्याचा JAACचा दावा.

  • गोळीबारात अनेक आंदोलक जखमी

  • भारताने या घटनेवर प्रतिक्रिया देत पाकिस्तानच्या दडपशाही धोरणांवर टीका केली

  • या घटनेमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील तणाव वाढण्याची शक्यता

Kashmir Attack News : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. रावलकोट येथे आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला आहे. जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीच्या माहितीनुसार, या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला असून १२ पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत.

JAACच्या म्हणण्यानुसार, आंदोलनाचा ताफा चिनार चौकातून पुढे जात मकबूल भट शहीद चौक येथे रात्री मुक्कामासाठी थांबण्यापूर्वी डी-चौकाच्या दिशेने निघाला होता. याचवेळी सुरक्षा दलांनी आंदोलकांवर गोळीबार केला. या घटनेत संघटनेचे संस्थापक उमर नझीर कश्मीरी यांचे धाकटे बंधू उस्मान नझीर यांच्यासह विविध भागांतील अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन बलुच नागरिकांचाही समावेश असल्याचे JAACने म्हटले आहे.

दरम्यान, भारतानेही या घटनांवर प्रतिक्रिया देत पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनांना इस्लामाबादच्या दीर्घकालीन प्रशासकीय दडपशाही आणि शोषणाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच आंदोलकांवर झालेल्या पोलिस कारवाईवर टीका केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे PoKमधील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानमध्ये भीषण हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये २४ जुलै रोजी उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात १२ पाकिस्तानी जवानांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या टँक जिल्ह्यातील लष्करी आणि पोलिस सुरक्षा चौकीवर हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन चौकीच्या बाहेरील भिंतीवर आदळवल्यामुळे भीषण स्फोट झाल्याचे लष्कराने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारावीत 50%… CET मध्ये 99%! भाजप नगरसेवकांच्या मुलांवर मोठा संशय; काँग्रेसचा खळबळजनक आरोप

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा 'तो' व्हिडिओ काही मिनिटांमध्ये सोशल मीडियावरून हटवला; मेटाकडून स्पष्टीकरण

Maharashtra News Live Update: परीक्षा सुधारणा विधेयकावर लोकसभा-राज्यसभेत चर्चा सुरु

Kangana Ranaut: 'जेनरेशन गटार', 'ड्रग्ज, दारू आणि शारीरिक संबंध...'; तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

Guru Purnima 2026 Rajyog : गुरु पौर्णिमेला ६० वर्षांनंतर जुळून आला राजयोग; या ४ राशींचं नशीब चमकणार, पैसाच पैसा मिळणार

SCROLL FOR NEXT