Pakistan News Saam Tv
देश विदेश

Pakistan News: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला, 4 चिनी अभियंत्यांसह 13 ठार

साम टिव्ही ब्युरो

Pakistan Attack: पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदरात रविवारी दुपारी चिनी अभियंत्यांवर दहशतवादी हल्ला झाला. ज्यामध्ये 4 चिनी अभियंते, 9 पाकिस्तानी सैनिक आणि दोन दहशतवादी ठार झाले आहेत, तर 27 लोक जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी मीडियानुसार, हे प्रमुख बंदर अब्जावधी डॉलर्सच्या 'चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर'चा (CPEC) एक महत्त्वाचा मुद्दा आहे. CPEC च्या थर्मल पॉवर प्रकल्पासाठी चिनी अभियंते येथे आले आहेत.

चीन CPEC प्रकल्पांतर्गत बलुचिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. दोन वर्षांपूर्वीही येथे चिनी अभियंत्यांवर फिदाईन हल्ला झाला होता. त्यात 9 अभियंते ठार झाले होते. (Latest Marathi News)

पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र दोन दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा लष्कराने केला आहे. बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी या हल्ल्याचे वर्णन 'आत्मबलिदान ऑपरेशन' असे केले आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बीएलए मजीद ब्रिगेडने आज ग्वादरमध्ये चिनी अभियंत्यांच्या ताफ्याला लक्ष्य केले. हल्ला अजूनही सुरू आहे. दरम्यान, बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सरकारसोबतचा युद्धविराम संपुष्टात आणल्यानंतर खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात बलुचिस्तानमधील झोब आणि सुई भागात पाकिस्तानी लष्कराचे 12 जवान मारले गेले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Crime : किरकोळ वाद टोकाला गेला; दोन कुटुंबात लोखंडी रॉड आणि बांबूने तुफान हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT