Shehbaz Sharif insulted Saam TV
देश विदेश

VIDEO : आमचा पंतप्रधान भित्रा, मोदींचं नाव घ्यायला घाबरतो; संसदेतच पाकिस्तानी खासदाराची सटकली

India-Pakistan tensions : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक संसदेत खासदार शाहिद अहमद यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची लाज काढली. "ते मोदींचं नाव घेण्यासही घाबरतात", असा घणाघात करत व्हिडिओ व्हायरल.

Namdeo Kumbhar

Pakistani MP Video Viral News : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संसदेत शुक्रवारी चर्चा झाली. त्याचवेळी पाकिस्तानी खासदारानंच त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची अक्षरशः लाज काढली. शाहबाज शरीफ यांचे सरकार तर लांडग्यासारखं आहे. आमचे पंतप्रधान भित्रे आहेत, असं खासदार म्हणाला.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक होत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले केले. त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतातच हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाकिस्तानी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट केले जात आहेत. सर्वच आघाड्यांवर भारत वरचढ ठरत आहे. दोन देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संसदेत शुक्रवारी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानी खासदारानेच त्यांचे सरकार आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची लाज काढली. शाहबाज सरकार लांडग्याचं आहे, असं खासदार म्हणाला.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला आहे. भारतानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. भारतानं दहशतवाद मुळापासून नष्ट करण्याचा विचार केला. तिथल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पण पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच आहे. त्यांनी भारतातील रहिवासी वस्त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. भारतानंही उलट्या काळजाच्या पाकिस्तानला धडा शिकवला. त्यांचे सगळे हल्ले परतवून लावले.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढलेला असतानाच, त्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या संसदेत चर्चा झाली. या चर्चेत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांनी शाहबाज सरकारविरोधात संताप व्यक्त केला. त्यांनी शरीफ सरकारची तुलना लांडग्याशी केली. पंतप्रधान शरीफ हे भित्रे आहेत. ते नरेंद्र मोदींचं नाव घ्यायलाही घाबरतात, असं ते खासदार म्हणाले.

खासदार शाहिद अहमद म्हणाले की, 'एका लष्कराचा सरदार वाघासारखा असेल आणि सैन्य लांडगे असतील तर ते सुद्धा युद्धात वाघासारखे लढतात. पण नेतृत्वच लांडग्याच्या हाती असेल तर, वाघही नांगी टाकतात. जर तुमचा नेता म्हणजेच पंतप्रधान भित्रा असेल, तर तुम्ही जनतेला काय संदेश द्याल. आमच्याकडे असा नेता आहे, जो नरेंद्र मोदींचं नावही घेत नाही. त्यांचं नाव घ्यायलाही घाबरतो.'

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात तर नरेंद्र मोदींचं साधं नावही घेतलं नाही. यांचे व्यापारी संबंध आहेत. तरीही त्यांचे नाव घेऊ शकत नाहीत. नवाज शरीफ तर भारताबद्दल चकार शब्दही बोलले नाहीत, असं खासदार शाहिद म्हणाले.

इम्रान खानसारख्या नेत्याला तुरुंगात डांबणारे ते स्वार्थी लोक नेमके कोण आहेत. मी त्यांना काल तुरुंगात भेटायला गेलो तर, परवानगी दिली नाही. ज्यांनी इम्रान खान यांना कैद केलंय त्यांच्याविरोधात पाकिस्तानी जनतेत प्रचंड रोष आहे, असेही खासदार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT