Pakistan Afghanistan Conflict saam tv
देश विदेश

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

Pakistan Afghanistan conflict: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या कुनार आणि पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. कुनारमध्ये तीन जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याचं अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितलं. या हल्ल्यामागचं कारण आणि दोन्ही देशांमधील तणाव जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा वाढलाय. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पूर्व भागातील कुनार प्रांतात लढाऊ विमानांमधून हल्ले केलेत. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी कुनारसोबतच पक्तिका भागालाही लक्ष्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानी लढाऊ विमाने या भागाच्या आकाशात फिरत होती. त्यानंतर कुनार प्रांतातील नर्गल जिल्ह्यातील पतंग भागात हवाई हल्ले करण्यात आले. या भागातील नूर मोहम्मद नावाच्या व्यक्तीच्या घराला लक्ष्य करण्यात आले.

एका घरावर हल्ला, आजूबाजूच्या घरांचेही नुकसान

पाकिस्तानी विमानांनी केलेल्या हल्ल्यात नूर मोहम्मद यांचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. या घरालाच का लक्ष्य करण्यात आलं याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्ल्याचा परिणाम आजूबाजूच्या घरांवरही झाला. अनेक घरांचं नुकसान झालं असून काही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि मलबा साचला आहे.

हल्ला झाला तेव्हा संबंधित घरात किती लोक होतं तसंच घरात कोणी होतं की नाही याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. पाकिस्तानी प्रशासनाकडून या घटनेनंतर नुकसानाचा आढावा घेतला जात आहे. मदत आणि बचाव पथकेही घटनास्थळी पोहोचली आहेत.

ईदच्या काळातही दोन्ही देशांमध्ये तणाव

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून तणाव वाढला आहे. ईदच्या काळात दोन्ही देशांनी युद्धविराम केला होता. काबुलमधील रुग्णालयावरील हल्ल्यात सुमारे 400 जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये वादाचं कारण काय?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वादामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी डुरंड रेषा आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP हे दोन प्रमुख मुद्दे आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची सीमा सुमारे 2,640 किलोमीटर लांब आहे. या सीमेला डुरंड रेषा म्हटलं जातं. ही सीमा 1893 मध्ये ब्रिटिशांनी ठरवली होती. मात्र अफगाणिस्तान या रेषेला अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा मानत नाही.

TTP मुळेही दोन्ही देशांमध्ये तणाव

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच TTP हा देखील पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वादाचा मोठा मुद्दा आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की अफगाणिस्तानमध्ये TTPच्या दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे. हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये हल्ले करत असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातो.

मात्र अफगाणिस्तानने पाकिस्तानचे हे आरोप फेटाळलेत. पाकिस्तानमधील दहशतवादी घटनांसाठी अफगाणिस्तानला जबाबदार धरता येणार नाही, असं अफगाणिस्तानचं म्हणणं आहे. पाकिस्तान आपल्या अडचणी आणि अपयशाचं खापर अफगाणिस्तानवर फोडत असल्याचा आरोपही अफगाणिस्तानकडून करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानकडूनही पाकिस्तानला प्रत्युत्तर

पाकिस्तानच्या हल्ल्यांना अफगाणिस्तानकडूनही प्रत्युत्तर दिलं जातं. अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या सीमा चौक्या आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं जातं. याशिवाय पाकिस्तानने अफगाण नागरिकांना देशातून बाहेर पाठवण्याची कारवाई केलीये. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी तणावपूर्ण झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT