सुप्रीम मस्कर, साम प्रतिनिधी
भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेल्या पाकड्याचा त्यांच्या लष्करावरचा विश्वासच उडालाय. त्यामुळेच पाकिस्तानच्या सुरक्षेचा डोलारा सांभाळण्यासाठी पाकनं चक्क राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदललाय. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI चे प्रमुख मोहम्मद असीम मलिक यांना थेट पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे NSA म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
मलिकांची नियुक्ती पाकला भारतीय सैन्याच्या कारवाईपासून वाचवू शकेल का? याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. कारण दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत. कोण आहेत असीम मलिक? ते पाहूया.
पंजाब प्रांतातील सरगोधा जिल्ह्यात असीम मलिकांचा जन्म
1989 मध्ये पाकिस्तान मिलिट्री अकादमी (PMA) मधून प्रशिक्षण
बलुचिस्तान आणि दक्षिण वझीरिस्तान भागांमध्ये इन्फंट्री ब्रिगेड आणि डिव्हिजनचे नेतृत्व
लष्कराच्या जनरल मुख्यालयात अॅडज्युटंट जनरल म्हणून कार्यरत
ISI चे 31 वे महासंचालक म्हणून जबाबदारी
पाकच्या लष्करी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षक
माजी ISI प्रमुख फैज़ हमीद यांच्या कोर्ट मार्शल प्रक्रियेचं नेतृत्व
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य कारवाईच्या तयारीत आहे. त्याचं भीतीनं पाकनं मध्यरात्री NSA म्हणून असीम मलिकांची नियुक्ती केलीय. या नियुक्तीआधी पाकच्या माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारताच्या कारवाईची भीती व्यक्त केली होती. भारताच्या गुप्त कारवायांचा थांगपत्ता नसणारे ISI चे प्रमुख आता पाकला काय सल्ला देणार? हा खरा सवाल आहे. दहशतवाद्यांना पोसणारं आयएसआय आणि त्याचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यानं दहशतवाद्यांपासून पाकला लांब राहण्याचा सल्ला देतील का? की दहशतवाद्यांना पोसण्यासाठी नवीन युक्त्या पाकला सुचवतील ? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.