Petrol Disel Rate Saam Tv
देश विदेश

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका, डिझेल ५२० वर तर पेट्रोलची किंमतही अवाक्याबाहेर

Pakistan Fuel Crisis : पाकिस्तानमध्ये इंधन दरांनी उच्चांक गाठला असून पेट्रोल ४५० रुपये तर डिझेल ५२० रुपयांवर पोहोचले आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटाचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे.

Namdeo Kumbhar

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इराण-इस्रायल संघर्षात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानमध्येच कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. डिझेलचे दर आता ५२० रुपये (PKR) प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर पेट्रोलने सुद्धा ४५० रुपयांचा (PKR) टप्पा ओलांडला आहे. केवळ पेट्रोल आणि डिझेलच नाही, तर पाकिस्तान सरकारने केरोसीनच्या किमतीतही मोठी वाढ केली आहे. केरोसीनचे दर ४५७.८० रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत.

पाकिस्तानमध्ये महागाईने उच्चांक गाठला असून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एकाच वेळी मोठी वाढ केली आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती दोन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. पाकिस्तानकडे सध्या अत्यंत मर्यादित इंधन साठा शिल्लक आहे. माहितीनुसार, देशात केवळ २८ दिवस पुरेल इतकाच पेट्रोल-डिझेलचा साठा असून कच्च्या तेलाचा साठा फक्त १० दिवसांचा आहे. देशातील बिघडलेली आर्थिक स्थिती आणि चलनाचे घसरलेले मूल्य यामुळे इंधन आयातीवर मोठा परिणाम झाला आहे.

अचानक झालेल्या या दरवाढीमुळे पाकिस्तानमधील सामान्य नागरिक हवालदील झाले आहेत. या दरवाढीमुळे वाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शहरांमध्ये जनतेने आपला संताप व्यक्त केला आहे. इंधन टंचाईच्या भीतीपोटी अनेक पेट्रोल पंपांवर लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Politics: गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; दरांडेंनी शिवीगाळ करत बाप काढल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी

Khan Sir : खान सरांच्या बॉडीगार्डनेचं केला कोचिंग सेंटरमध्ये गोळीबार? 'त्या' व्हिडिओने उडाली खळबळ

Walking after dinner: मासिक पाळी अनियमित आहे? रात्रीच्या जेवणानंतर १५ मिनिटं चालण्याची सवय ठरू शकते फायदेशीर

Famous Singer Death : जादुई आवाज हरपला! ज्येष्ठ गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT