Pakistan Economic Crisis  Saam Digital
देश विदेश

Pakistan Economic Crisis : पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ३ अब्ज डॉलरचं कर्जही संपलं, पुढच्या ३० दिवसात काय घडणार? जाणून घ्या

Pakistan Economic Crisis : पाकिस्तान सध्या आर्थिक आणि राजकीय संकटात आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामुळे गंभीर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं, असा अंदाज मुडीजने (Moody's) आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.

Sandeep Gawade

Pakistan Economic Crisis

पाकिस्तान सध्या आर्थिक आणि राजकीय संकटात आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटामुळे गंभीर आर्थिक संकटाला सामोरं जावं लागू शकतं, असा अंदाज मुडीजने (Moody's) आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. पाकिस्तानवर ४९.५ अब्ज डॉलरचं आधीच कर्ज आहे, त्यामुळे एप्रिलमध्ये नवीन कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) शी संपर्क साधणे आणि नवीन कर्ज मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं मोठं आव्हान नवीन सरकारसमोर असणार आहे.

IMF ने गेल्या जून महिन्यात पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं होतं. ज्याचा नऊ महिन्यांचा कालावधी आता संपत आला आहे. दुसरीकडे सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे पाकिस्तानला पुन्हा मोठ्या कर्जाची गरज आहे. मूडीजने पाकिस्ताला धोक्याचा इशारा दिला असून एप्रिलपर्यंत पाकिस्तानची तिजोरी रिकामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी कोलमडण्याची शक्यता आहे.

क्रेडिट रेटिंग घसरले

मूडीजने पाकिस्तानच्या कर्जाचे क्रेडिट रेटिंग CAA1 वरून CAA3 पर्यंत घसरल्याचं म्हटलं आहे. जे डीफॉल्टपेक्षा फक्त 2 नॉच वर आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था IMF च्या कर्जवार अबलंबून असते त्यामुळे पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा असेल. मूडीजचा हा दावा पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा आहे कारण देशाची अर्थव्यवस्था केवळ आयएमएफच्या कर्जाच्या मदतीने चालत आहे. पाकिस्तानने 2023 मध्येच IMF कडून कर्ज घेतलं होतं, मात्र 2024 च्या सुरुवातीला पुन्हा कर्जाची गरज भासली आहे, यावरून पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो.

49.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडायचं कसं?

2011 पासून पाकिस्तानचं विदेशी कर्ज जवळपास दुप्पट झालं आहे. तर देशांतर्गत कर्ज 6 पट वाढलं आहे. गेल्या वर्षीच पाकिस्तानला IMF कडून 3 अब्ज डॉलर्सची मदत मिळाली होती. मुडीजने पाकिस्तान निवडणुकीनंतरच्या परिस्थिवर व्यक्त केलेला अंदाज नव्या सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पाकिस्तानमध्ये कोणचंही सरकार आलं तरी राजकीय अस्थिरता कायम असेल, असंही अहवालात म्हटलं आहे. २०२४ मध्ये पाकिस्तानला 49.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडायचं आहे आणि यातील ३० टक्के हिस्सा हा कर्जावरील व्याजाचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का;चंद्रकांत पाटील विजयाच्या वाटेवर

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT