Pakistan Saam
देश विदेश

Pahalgam Pakistan: कंगाल पाकिस्तानचं नसतं धाडस! भारतीय सीमेजवळ रणगाडे, फायरिंगचाही सराव; पायावर कुऱ्हाड मारून घेणार

India-Pakistan Tensions Rise: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली असतानाच, पाकिस्तानने देखील स्वतःची तयारी सुरू केली आहे.

Bhagyashree Kamble

जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला आहे. भारताने महत्त्वाची पावलं सुरूवात केली असतानाच, पाकिस्तानने देखील आपली कंबर कसली आहे.

पाकिस्तानने एलओसीजवळ मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, या युद्धसरावात पाक सैन्य गोळीबाराचा सराव करत असून, जड शस्त्रे आणि रणगाडे वापरत आहे.

भारताकडून पाकिस्तानविरोधात कारवाईचा इशारा मिळाल्यापासून पाकिस्तान दबावात आहे. त्यामुळेच पाकिस्तानकडून धमक्यांची भाषा आणि युद्धसराव सुरू करण्यात आला आहे. अनेक देश युद्धाच्या पूर्वतयारीसाठी अशा प्रकारचे सराव करतात.

या सरावाचा उद्देश म्हणजे, कोणत्याही आक्रमणाला योग्य उत्तर देण्याची तयारी करणे. पाकिस्तानी वाहिनी जिओ न्यूज आणि सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरावात सैनिकांनी आणि अधिकाऱ्यांनी युद्धसदृश परिस्थितीच्या सरावाला सुरूवात केली आहे.

सराव नेमका कुठे सुरू आहे?

पाकिस्तानी माध्यामांनुसार, पाकिस्तानी सैन्याचा युद्धसराव २९ ते ३० एप्रिल दरम्यान एलओसी रेषेजवळील कयानी आणि मंडल सेक्टरमध्ये पार पडले. काही अहवालांमध्ये टिल्ला टेस्ट फायरिंग रेंजचाही उल्लेख आहे. जिथे पाकिस्तानी सैन्य अनेकदा शस्त्रांच्या चाचण्या घेत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT