Pakistan Bus Fire Saamtv
देश विदेश

Pakistan Bus Fire: पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना! अपघातानंतर बस पेटली... २० जणांचा होरपळून मृत्यू ; भयानक व्हिडिओ

Pakistan Bus Fire Viral Video: पाकिस्तानातील पंजाबमधील पिंडी भटियानजवळ ही दुर्घटना झाली. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Pakistan Bus Accident: पाकिस्तानमधून एक भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील पंजाबमधील पिंडी भटियानजवळ ही दुर्घटना झाली. ज्यामध्ये बसला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे...

याबाबत पाकिस्तानी वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार 35 ते 40 प्रवाशांना घेऊन ही बस कराचीहून इस्लामाबादला जात होती. पंजाबमधील पिंडी भटियानजवळ ही भरधाव बसच डिझेलचे ड्रम वाहून नेणाऱ्या पिकअप व्हॅनला धडकली या अपघातानंतर बसने पेट घेतला. या आगीने बसमधील प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला.

स्थानिकांनी तात्काळ धाव घेत खिडक्या तोडून प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र २० पेक्षा अधिक प्रवाशांचा या दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे चालकही ठार झाले.

ही आग इतकी भीषण होती की बस जळून खाक झाली. या भीषण आगीत जखमी झालेल्या प्रवाशांवर सध्या उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. त्यानंतर या बस अपघाताने पाकिस्तान हादरुन केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT