Pakistan Blast News Saam Tv
देश विदेश

Pakistan Blast News: पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या बैठकीत भीषण स्फोट, 35 जणांचा मृत्यू; 200 हून अधिक जखमी

Pakistan News: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट, 35 जणांचा मृत्यू; 200 हून अधिक जखमी

Satish Kengar

Pakistan Blast News: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वात रविवारी एका इस्लामिक राजकीय पक्षाच्या परिषदेत भीषण स्फोट झल्याची बातमी समीर येत आहे. या स्फोटात 35 लोक ठार आणि 200 हून अधिक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

जिओ न्यूजने पोलिसांच्या हवाल्याने सांगितले की, बाजौरमधील खार येथे जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजलच्या (JUI-F) कार्यकर्ता परिषदेत हा स्फोट झाला. हा एक आत्मघाती हल्ला होता, असे म्हटले जात आहे.

स्थानिक पोलिसांनी सांगितले की, स्फोटात सुमारे 200 लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी परिसराची नाकेबंदी केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत माहिती देताना बचाव दलाचे प्रवक्ते बिलाल फैजी यांनी डॉन वृत्तपत्राला सांगितले की, पाच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेचा निषेध करताना पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसीन नक्वी म्हणाले की, देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. जे निष्पाप लोकांच्या जिवाशी खेळतात त्यांना माणूस म्हणवण्याची लायकी नाही, असे ते म्हणाले.

जेयूआय-एफ खैबर पख्तुनख्वाचे प्रवक्ते अब्दुल जलील खान यांनी जिओ न्यूजला सांगितले की, मौलाना लईक परिषदेला संबोधित करत असताना दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट झाला. प्रांतीय प्रवक्त्याने सांगितले की, या परिषदेदरम्यान मौलाना जमालुद्दीन आणि सिनेटर अब्दुल रशीद हे देखील उपस्थित होते. त्यांनी पुष्टी केली की, जेयूआय-एफचे तहसील खार अमीर मौलाना झियाउल्ला याचाही या स्फोटात मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT