Pakistan flood News Saam tv
देश विदेश

Pakistan flood : पाकिस्तानात पुराचा कहर; २० दिवसांत २०० जणांचा मृत्यू

Pakistan flood News : पाकिस्तानात पुराचा कहर पाहायला मिळतोय. या पावसामुळे २० दिवसांत २०० जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Pakistan Natural Disaster Videos : पाकिस्तानात पुराचा कहर पाहायला मिळत आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रात पुराने हाहाकार माजवला आहे. पुरामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. जून महिन्यात सुरु झालेल्या पावसांमुळे आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे.

एएनआयच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानातील पुरात आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात १०० लहान मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या पंजाबमधील १२१, खैबर पख्तूनख्वा ४०, सिंधमधील २१, बलूचिस्तानमधील १६, इस्लामाबादमधील १, पीओकेमधील १ जणाचा मृत्यू झाला आहे. यात ३० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पुरामुळे १८० हून अधिक लहान मुलांसहित ५५० लोक जखमी झाले आहेत. पुरामुळे अनेक जण बेघर झाले आहेत.

रिपोर्टनुसार, रावळपिंडीत पुरामुळे घर, रस्ते, शेतजमीन पाण्याखाली गेले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. अनेक गावात पुराच्या पाण्याचा शिरकाव झाला आहे. पुराच्या पाण्यात अनेकांची घरे वाहून गेली आहेत. लोकांची जनावरे देखील वाहून गेली आहेत. लोक घरदार सोडून इतरत्र स्थलांतर केलं आहे.

फैसलाबादमध्ये पुराच्या पाण्यामुळे २ दिवसांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबच्या चकवालमध्ये ४५० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. ३२ रस्ते वाहून गेले आहेत. भूस्खलनामुळे रस्त्यावरील विजेच्या खांबांची लाइट गेली आहे. अनेक गावातील वीजसेवा देखील ठप्प झाली आहे. मोबाईल नेटवर्क ठप्प झालं आहे.

रिपोर्टनुसार, २०२२ साली देखील भयंकर पूर आला होता. या पुरात १७०० लोकांनी जीव गमावला होता. त्यावेळी देखील लाखो लोक बेघर झाले होते. त्यावेळी पाकिस्तानला तब्बल ३४५ कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालं होतं. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत या पावसाचा कहर पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानात पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT