Jammu-Kashmir To Mumbai Air Fare Increased saam tv
देश विदेश

Pahalgam Attack: श्रीनगरहून येण्यासाठी तिप्पट भाडेवाढ; श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट 56 हजार रुपये, नेटीझन्सचा संताप

Jammu-Kashmir To Mumbai Air Fare Increased: सरकारच्या आदेशानंतर एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीने श्रीनगरहून उड्डाण करणाऱ्या 4 विमानांची संख्या वाढवलीय.

Bharat Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक पर्यटक माघारी परतत आहेत. विमान तिकीट आणि रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालीय. मात्र काही विमान कंपन्यांनी स्वत:चा खिसा भरण्याची संधी शोधत विमान तिकीटाचे दर तीन पटीने वाढवलेत.

सोशल मीडियावर काही युजर्संने विमान तिकीटाचे दर शेअर केली आहेत. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने नेटीझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आलाय. त्यानंतर सरकारने याप्रकरणाची दखल घेत तिकीट रद्दचे चार्ज आणि rescheduling चार्ज न लावण्याचे आदेश दिलेत.

नागरी उड्डाण विभागाने देशभरातील एअरलाईन्सला निर्देश देत तिकीट रद्दचे चार्ज आणि rescheduling चार्ज न लावण्याचे आदेश DGCA ने दिलेत. विमान कंपन्यांनी तिकीट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आलेत. डीजीसीएने आज सकाळी हे आदेश जारी केले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटक आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आलेत.

हजारो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरला आलेत. पण दहशतवादी हल्ल्या झाल्याने ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे स्वस्त तिकीट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएकडून विमान कंपन्यांना दिलेत.

श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट 56 हजार रुपये

पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून मुंबई जाण्यासाठी असणाऱ्या तिकीटांचे दर वाढविण्यात आले आहेत. काही युजर्संने सोशल मीडियावर तिकीट दरांचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. तिकीट दरात तब्बल तीन पटीने वाढ करण्यात आलीय. श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट 56 हजार रुपयांपर्यत वाढवण्यात आले आहे, एका एक्स सोशलसाइट युजर्संने स्क्रीन शॉट शेअर करत तिकीट दर दाखवले आहेत. यामुळे नेटीझन्सने विमानकंपन्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News: अरे देवा! विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या छत्र्या शिवसेना कार्यकर्त्यांनीच पळवल्या|Video

Shravan Importance: श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातील या वस्तू बाहेर काढा,अन्यथा...

'आई-बाबा, माझा मृतदेह घरी आणल्यावर मला मिठीत घ्या..' तरूणीनं बँकेतच आयुष्य संपवलं; चिठ्ठीतून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: कल्याण डीसीपी स्कॉडची कारवाई! दोन एमडी तस्करांना बेड्या, 22 लाखांचे एमडी ड्रग्स जप्त

Pune Crime : पुणे हादरलं! पाठलाग केला, जबरदस्तीने जंगलात नेलं अन्...; महिलेसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT