Pahalgam Attack has been revealed after the NIA investigated Saam Tv News
देश विदेश

हातात AK-47 आणि M4, दाट जंगलातून वाट काढत २२ तास चालत राहिले; पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे आले?

Pahalgam Terror Attack : आता पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएने (NIA) हाती घेतला आहे. त्याचदरम्यान, नुकतीच एक अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसतेय. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत ही माहिती पुढे आलीये.

Prashant Patil

जम्मू-काश्मीर (पहलगाम) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर एकच खळबळ उडालीये. मागील काही दिवसांपासून पर्यटक जम्मू-काश्मीरला मोठ्या संख्येने जाताना दिसले. मात्र, पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. पहलगामवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवाद्यांनी महिला आणि लहान मुलांसमोर पुरूषांवर गोळ्या घातल्या. या घटनेचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या हल्ल्यात हिंदूंना टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतंय.

आता पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएने (NIA) हाती घेतला आहे. त्याचदरम्यान, नुकतीच एक अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसतेय. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत ही माहिती पुढे आलीये. दहशतवादी हे AK-47 आणि M4 येऊन दाट जंगलातून २२ तास चालून पहलगामला पोहोचले होते. पहलगामला पोहोचण्यासाठी त्यांनी एका अॅपची मदत घेतल्याचंही सांगितलं जातंय.

चारही दहशतवादी घनदाट जंगलातून चालत पहलगामला पोहोचले होते. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी दोन दहशतवादी हे एका स्टॉलच्या मागून आले. त्यांनी उपस्थित पर्यटकांना कलमा वाचण्यास सांगितलं आणि गोळीबार करण्यास सुरूवात केली. यासोबतच या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ देखील कॅमेऱ्यात कैद झालाय. एनआयएच्या हाती एक मोठा पुरावा सापडल्याचं सांगितलं जातंय.

ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी घटनास्थळी भारतीय वायुसेनेचे लेफ्टनंट कर्न तेथे उपस्थित होते. ते आपल्या कुटुंबियांसोबत येथे फिरायला आले होते. या दहशतवादी हल्ल्याची माहिती सर्वात अगोदर २.३० वाजेच्या सुमारास हिमांशी नरवाल यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी मोठे खुलासे होताना दिसत आहेत. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांविरोधात देखील कारवाई केली जातेय. हे दहशतवादी मागील काही दिवसांपासून रेकी करत असल्याचीही माहिती पुढे आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा

PM Kisan Yojana: तारीख ठरली! ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट २००० येणार, अधिकृत तारीख आली समोर

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT