देश विदेश

India vs Paksitan: भारतात ५ लाख पाकिस्तानी मुली; आत घुसलेल्या 'या' शत्रूंशी कसं लढायचं? भाजप खासदाराचा प्रश्न

Pahalgam Attack : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रदद् करत त्यांना ४८ तासात पाकिस्तानात परत जाण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर पाकिस्तानात जाण्यासाठी सीमेरेषेवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Bharat Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले. सरकारने पाकिस्तानी नागिरकांचा व्हिसा रद्द केलाय. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगितले होतं. त्यानंतर अटारी सीमेवर पाकिस्तानात परतणाऱ्यांची मोठी रांग दिसून आली. यात भारतात लग्न झालेल्या महिलांची मोठी संख्या होती.

यावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबद्दल पोस्ट करत दहशतवाद्यांचे नवीन रुप समोर आल्याचं म्हटलंय. या नव्या दहशतवाद्यांशी कसं लढायचं असा सवालही त्यांनी या पोस्टमधून केलाय. निशिकांत दुबे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो पोस्ट केलाय. त्याला त्यांनी दहशतवादाचं नवं रुप असं म्हटलंय. निशिकांत दुबे यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं की, भारतीयांशी लग्न करून पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुली भारतात राहत आहेत.

आजपर्यंत त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालेले नाहीये. या आत घुसलेल्या या शत्रूंशी कसे लढायचे? असा सवाल दुबे यांनी केलाय. एका दिवसाआधी निशिकांत दुबे यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना म्हटलं की, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी हिंदुंना निवडणून निवडून मारलंय. मोदी सरकार कोणत्याही प्रकारे याचा बदला घेतील. पाकिस्तानने घेतलेला काश्मीरचा भाग कोणत्याही किंमतीत परत घेतला जाईल.

पाकिस्तानचे विभाजन करून, बलुचिस्तान, पख्तूनिस्तान आणि पंजाब हे वेगळे देश बनतील,असंही भाजप खासदार म्हणालेत. निशिकांत दुबे यांनी दावा केला की पंतप्रधान मोदी हे करतील. जर या वर्षानंतर पाकिस्तानचे अनेक तुकडे झाले नाहीत, तर लोक असे म्हणण्यास मोकळे होतील की भाजपचे लोक खोटे आश्वासन देतात.

पाकिस्तान संपून जाईल. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी घटनेनंतर भारताने कठोर कारवाई करत सिंधू पाणी करार स्थगित केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसाही रद्द केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambar Recipe: साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT