नोएडा: उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh नोएडा Noida येथील खोदना खुर्द गावातील एका व्यक्तीने क्रूरतेची परिसीमा गाठली आहे. त्या व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकले म्हणून, त्याने 58 गायींना पाण्यातून विष पाजून मारून टाकले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे देखील पहा-
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी हा एका व्यक्तीकडे नोकरी करत होता. त्या आरोपीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे मालकाने त्याला कामावरून काढून टाकले होते. त्याचा बदला घेण्यासाठी त्याने गायींना विष देऊन मारले आहे अशी माहिती समोर येत आहे.
या घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोदना खुर्द येथे ओमवीर नागर यांची डेअरी आहे. त्यांच्याकडे अनेक गायी होत्या. ओमवीर नागर यांच्या 58 गायींचा पाच दिवसांमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांना संशय आला त्यामुळे त्यांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील बोलावले.
डॉक्टरांनी गाईंची तपासणी केली असता तपासात गायींचा मृत्यू विषामुळे झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धागेदोरे तपास करत, पोलिसांनी नागर यांच्याकडील जुन्या नोकराला अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपी हा दारूडा होता त्यामुळे त्याला नागर यांनी नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरीवरून काढून टाकल्याचा राग आरोपीच्या मनात होता त्यामुळे त्याने या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरवले होते. यामुळे बदला घेण्यासाठी त्याने गायींना ज्या हौदातून पाणी पाजले जाते, त्या हौदामध्ये विष मिसळले होते आणि हौदातील पाणी प्यायल्याने गायींचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.