अन्यथा तुमच्याबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील- मोदींची भाजपच्याच खासदारांना ताकीद Saam Tv
देश विदेश

अन्यथा तुमच्याबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील- मोदींची भाजपच्याच खासदारांना ताकीद

संसदेच्या अनेक सत्रांमध्ये तसेच पक्षाच्या बैठकीत भाजपचे खासदार हे गैरहजर राहतात, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याच पक्षातल्या खासदारांवर संतापले आहेत.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारला अनेक मुद्द्यांवरुन धारेवर धरत आहे. मात्र, विरोधकांना उत्तर देण्यासाठी भाजपचे अनेक खासदार (BJP MP's) संसदेतच येत नाही त्यामुळे विरोधकांना आणखी संधी मिळते. संसदेच्या अनेक सत्रांमध्ये तसेच पक्षाच्या बैठकीत अनेक खासदार हे गैरहजर राहतात, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आपल्याच पक्षातल्या खासदारांवर चांगलेच संतापले असून मोदींनी खासदारांना संसदेत आणि पक्षाच्या महत्वाच्या बैठकीत नियमितपणे हजर राहण्याची ताकीद दिली आहे. (Otherwise, tough decisions will have to be taken against you - Modi warns BJP MP's)

हे देखील पहा -

नरेंद्र मोदी आपल्या पक्षातल्या खासदारांना म्हणाले की, संसदेत जर आपल्या (भाजपच्या) खासदारांची उपस्थिती कमी असेल तर सरकारच्या कामावर परिणाम होतो. मी नियमितपणे तुम्हाला संसदेत हजर राहण्यासाठी सांगत असतो, तुमच्या अनुपस्थितीचा परिणाम सरकारच्या कामकाजावर होतो. आपण लहान मुलांंना जर एखादे काम सांगितले आणि त्याने ते ऐकले नाही तर आपल्याला किती राग येतो. तर मग तुमच्या अनुपस्थितीमुळे (Absent) माझी आणि संसदीय कार्यमंत्र्यांची काय अवस्था होत असेल? असं मोदी खासदारांना उद्देशून म्हणाले.

पुढे मोदींनी खासदारांना ताकिद दिली की, मला सारखं-सारखं लहान मुलांप्रमाणे सांगायला आवडत नाही. तुम्ही संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाला हजर राहिलं पाहिजे. पक्षाच्या बैठकीला हजर राहिलं पाहिजे, स्वतःला बदला आणि सुधारणा करा. अन्यथा भविष्यात तुमच्याबाबत कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी ताकीदच (Warning) मोदींनी भाजपच्या दांडीबहाद्दर खासदारांना दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : महाराष्ट्रात बहुमत कोणाला ? मविआचा प्लान बी तयार

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT