Operation Sindoor Saam Tv
देश विदेश

Operation Sindoor: NAD च्या बैठकीत PM मोदींचा सत्कार, ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल अभिनंदन; पाहा VIDEO

PM Narendra Modi: ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशानंतर एनडीएच्या बैठकीमध्ये आज पीएम मोदी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांनी मोदींचे अभिनंदन केले. तसंच 'हर हर महादेव'चा जयघोष करण्यात आला.

Priya More

दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशानंतर पीएम मोदी यांचे सर्वांनी अभिनंदन करत सत्कार केला. यावेळी 'भारत माता की जय', 'हर हर महादेव'चा जयघोष आणि टाळ्यांच्या कडकडाटामध्ये पीएम मोदींचे स्वागत करण्यात आले. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

जून २०२४ मध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर संसदेच्या अधिवशेनादरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीच्या खासदारांची ही दुसरी बैठक झाली. हर हर महादेव आणि भारत माता की जयच्या घोषणा देत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पीएम मोदींचे स्वागत केले. यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबाबत पीएम मोदींचे कौतुक करण्यात आले. यावेळी आनंदाचे वातावरण होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी पीएम मोदींच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातला. त्यानंतर पीएम मोदींनी सर्वांचे आभार मानले.

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी उड्डे उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्याचे भारताने जशाच तसं उत्तर दिलं. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. त्यानंतर भारताने ऑपरेशन महादेवद्वारे अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला.

संसदेच्या पावसासाळी अधिवेशनादरम्यान एनडीएची ही महत्वाची बैठक पार पडली. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरलं आहे. निवडणूक आयोगाच्या कथित पक्षपाती वर्तन, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर यावरून विरोधी पक्ष सरकारवर जोरदार टीका करत आहे. यावरून विरोधक अधिवेशनादरम्यान सुरू असलेल्या चर्चेत गोंधळ घातलाना दिसत आहे त्यामुळे संसदेचे कामकाज ठप्प केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

E-Sakal No.1: नवीन वर्षाची नवी सुरुवात! ई-सकाळ ठरली नंबर 1 वेबसाइट

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; VIDEO समोर

BMC Election 2026: मुंबई निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? किती आहे एकूण मालमत्ता?

Accident : उज्जैनला जाताना काळाचा घाला, ३ जणांचा जागेवरच मृत्यू, जळगावात घाटात गाडीवर नियंत्रण सुटले अन्...

2026 मध्ये WhatsApp चॅटिंगचा अंदाज बदलणार; जे लिहू त्याचा Sticker बनेल, आताच जाणून घ्या 3 स्मार्ट फीचर्स

SCROLL FOR NEXT