खासगी बँकेत काम करणाऱ्या तरूणीचं ऑनलाईन टास्कमुळे लाखोंचं नुकसान झालं. यामुळे तिनं स्वत: ला संपवण्याचा निर्णय घेतला. बँकेच्या आवारातच तिनं कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिनं चिठ्ठी लिहिली. यात तिनं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितलं. तसेच आपल्या आई वडिलांसाठी भावनिक मेसेजही लिहिला. ही तरूणी गुजरातमधील रहिवासी होती. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
भुमिका सोरठिया असे मृत तरूणीचं नाव आहे. ती गुजरातच्या अमरेली येथील रहिवासी आहे. भूमिका आयआयएफएल या खासगी कंपनीत कार्यरत होती. सर्व काही अलबेल सुरू होतं. मात्र, ती अचानक एका ऑनलाईन स्कॅममध्ये अडकली आणि तिनं लाखोंचं नुकसान झालं. काही महिन्यांपूर्वी टेलिग्राममधून चालणाऱ्या ऑनलाईन टास्क स्कॅममध्ये ती फसली. या स्कॅममध्ये ५०० रूपये दिल्यानंतर ७०० रूपये मिळायचे, असं एकंदरीत आमिष दाखवण्यात आलं होतं.
सुरूवातीला तिला लहान रक्कमही मिळाली. त्यामुळे तिनं या स्कॅमवर डोळे झाकून विश्वास ठेवला. मात्र, या स्कॅममध्ये अडकत गेली. बघता बघता डोक्यावर २८ लाखांचं कर्ज निर्माण झालं. त्यामुळे तिनं मानसिक तणावाखाली आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी तिनं बँकेच्या आवारातच कीटकनाशक पिऊन स्वत:ला संपवलं.
आत्महत्या करण्यापूर्वी तिनं सुसाईड नोट देखील लिहिली होती. यात तिनं आत्महत्या करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. तिनं आई वडिलांना बँकेतून ५ लाख रूपये घ्यायला सांगितले. तसेच पीएफची जमा झालेली रक्कम देखील घ्यायला सांगितली. या चिठ्ठीतून तिनं आपल्या आई वडिलांसमोर शेवटची इच्छा व्यक्त केली. मृतदेह घरी आल्यानंतर तिनं आई वडिलांना मिठी मारायला सांगितली.
या घटनेनंतर खांबा पोलिसांनी अपघाती मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. तपासात टेलिग्राम आयडीची ओळख पटली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.