भोपाळ : कोरोना Corona काळात ऑनलाईन Online फ्रॉडच्या प्रकरणात बरेच मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याने, अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. अशा फसवणुकीचा प्रकार आता मध्य प्रदेश Madhya Pradesh मधील राजधानी भोपाळ Bhopal या ठिकाणी उघडकीस आली आहे. मुंबई Mumbai मधील कार एजेंटच्या नावाने एका व्यक्तीस भोपाळ येथील व्यावसायिकाला तब्बल ६७ लाखांचा गंडा घालण्यात आले आहे.
केवळ एका ऑफरच्या जाळ्यात मध्ये अडकून व्यावसायिकाला खूप मोठा फटका बसलेला आहे. मुंबई मधील कार एजेंट सांगत व्यावसायिकाची मर्सिडीज कारच्या नावाने ६७ लाखांची फसवणूक झालेली आहे. व्यावसायिक ३ लाखांच्या एका डिस्काउंट ऑफर मध्ये चांगलाच अडकला आहे. मोठी फसवणूक या मध्ये झाली आहे. साहिब गंगवानी असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हे देखील पहा-
ते एका कंपनीचे डायरेक्टर देखील आहेत. २०२० मध्ये त्यांनी मर्सिडीज घेण्याचे ठरवले होते. त्यांनी याकरिता ऑनलाईन सर्च करण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांना मुंबई मधील मैत्री ही वेबसाईट बघितली. या वेबसाईटवर आल्यावर नंतर त्यांना मर्सिडीजवर ३ लाख रुपयांची डिस्काउंट ऑफर दिसली होती. ७० लाखांची मर्सिडीज ६७ लाखांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत.
साहिब यांनी वेबसाईट वरती दिलेल्या नंबरवर संपर्क करुन चर्चा केली आहे. समोरच्या व्यक्तीने तो नवी मुंबईत मध्ये असणाऱ्या एका कंपनीचा एजेंट असल्याचे सांगितले. दोघांमध्ये चर्चा झाली आणि डीलदेखील पक्की झाली. साहिब यांनी ६७ लाख रुपये या मोठी रक्कम समोरच्या व्यक्तीने मागितलेल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आहे. परंतु, १ महिना झाल्यानंतर देखील कार डिलीव्हर झाली नव्हती.
यावेळी साहिब यांनी त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केले होते, परंतु त्याचा नंबर बंद लागत होता. ७० लाख रुपयांची गाडी ६७ लाखांमध्ये, यात केवळ ३ लाखांच्या ऑफरच्या जाळ्यात सापडून, त्यांना ६७ लाखांचा मोठा फटका बसलेला आहे. साहिब यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलेली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. पोलीस मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती सध्या मिळवत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.