ऑनलाईन गेमिंगच्या विळखा तरूणाईभोवती आवळत चाललाय.. ही ऑनलाईन सट्टेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली असून यासंदर्भातलं विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिलीय. त्यामुळे आता ड्रीम-11 ने मोठा निर्णय घेतलाय. ड्रीम-11 नं PAY TO PLAY हा ऑप्शन रद्द केलाय...शिवाय ड्रीम-11 ऍप वापरणाऱ्यांनी आपले पैसे काढून घ्यावेत, असे आवाहनही केलंय.. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगवरील कोणते बदल पाहायला मिळाले पाहूयात...
ड्रीम-11 गेमिंग अॅपवरील बंदीमुळे क्रिकेट इंडस्ट्रीवर परिणाम होऊन जवळपास 17 हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जातेय. रिअल मनी गेमिंगमध्ये ड्रीम स्पोर्ट्समधून कंपनीला 67 टक्के उत्पन्न मिळत होते. हे आता पूर्णपणे बंद झाले. तसचं 700 विदेशी गेमिंग कंपन्यांनाही याचा फटका बसला असून गेमिंग वॉलेटमधील पैसे प्लेअर्सना परत देताना कंपनीची तारांबळ उडत आहे.. कंपनीवरील आर्थिक बोजाही वाढलाय.
दरम्यान ऑनलाईन गेमिंग अॅपवरील पैशाशी संबंधित सर्व व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. या निर्णयाचं उल्लंघन केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 50 लाख ते 1 कोटींचा दंड होऊ शकतो. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी पे टू प्लेचा अॅप्शन कायमस्वरुपी बंद केलाय. मात्र विधेयकाच्या मंजुरीनंतर ऑनलाईन गेमिंगवरील सट्टेबाजी कायमस्वरुपी थांबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनेही सतर्क राहायला हवं...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.