Russia Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia Ukraine War : रशियाच्या हल्ल्यानंतर १० लाख नागरिकांनी युक्रेन सोडला

रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याने युक्रेनमधील प्रमुख शहरांमध्ये विध्वंस घडवून आणला आहे.

साम वृत्तसंथा

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये सलग आठव्या दिवशीही युध्द सुरु आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव आणि प्रमुख औद्योगिक शहरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही शहरांतील अनेक नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपून बसले आहेत. युद्धग्रस्त युक्रेनमधून मोठ्या संख्येने नागरिक देश सोडून जात आहेत.

रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर १० लाख नागरिकांनी युक्रेन सोडला आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतरही नागरिकांनी मोठ्या संख्येने अफगाणिस्तान सोडला होता. यानंतरची ही सर्वात मोठी दुसरी जागतिक घटना आहे.

40 लाख नागरिक युक्रेन सोडू शकतात

स्थलांतरितांची संख्या युक्रेनच्या लोकसंख्येच्या दोन टक्क्यांहून अधिक आहे. जागतिक बँकेच्या मते, 2020 च्या अखेरीस युक्रेनची लोकसंख्या 4 कोटी होती. सुमारे 40 लाख नागरिक युक्रेन सोडू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे.

रशियाने (Russia) युक्रेनवरती हल्ला सुरु केल्यानंतर सात दिवसात युक्रेनमधून १० लाख नागरिकांनी पलायन केले आहे. युक्रेनमधील नागरिक जीवाच्या भितीने शेजारील असणाऱ्या देशात जात आहेत.

बुधवारी, युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमधील दोन निवारा गृहात राहणारे 200 हून अधिक अपंग युक्रेनियन नागरिक हंगेरियन शहर जाहोनी येथे आले आहेत. निर्वासितांमध्ये अनेक मुलांचा समावेश आहे.

रशियाने युक्रेनमधील शहरांवर हल्ला सुरु केल्यानंतर नागरिकांनी जीवाच्या भितीने बंकरची मदत घेतली. अनेक तास ते बंकर मध्ये बसले. अनेक नागरिकांनी पोलंडमध्ये स्थलांतर केले आहे. तर अनेकांनी हंगेरी, मोल्दोव्हा, स्लोव्हाकिया, तसेच इतर युरोपियन देशांमध्ये गेले आहेत.

रशिया (Russia )आणि युक्रेनमध्ये आज आठव्या दिवशीही युध्द सुरु आहे. रशियाने युक्रेनच्या शहरांवरील हल्ले वाढवले आहेत. सैनिकांचा अजून ताफा युक्रेनमध्ये पाठवला आहे.

Edited by- santosh kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील आघाडीवर

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT