उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने सहा जिल्ह्यांत एकाच वेळी नोकरी केल्याचा घोटाळा उघड.
अर्पित सिंग नावाने बनावट कागदपत्रं वापरून सरकारी पगार घेतला.
तब्बल ९ वर्षं सहा ठिकाणी नोकरी करत ४.५ कोटींचा चुना लावला.
पोलिसांनी फसवणूक, बनावट कागदपत्रं वापरणे यांसह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला.
योगी सरकारमध्ये खळबळ, आरोग्य विभागावर तीव्र टीका.
एक व्यक्ती सहा वेगवेगळ्या जिल्ह्यात एकाच विभागात एकाचवेळी नोकरी करू शकतो का? तुम्ही याचा विचारही केला नसेल. पण उत्तर प्रदेशमध्ये असं प्रकरण समोर आले आहे. आर्पित सिंग हा व्यक्ती मागील नऊ वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागात सहा जिल्ह्यात एकाचवेळी नोकरी करत होता. त्या व्यक्तीला सहा ठिकाणी प्रत्येक महिन्याला ६९ हजार ५९५ पगार मिळत होता. सहा जिल्ह्यांमध्ये एकाच नावाने, एकाच जन्मतारीख, वडिलांचे नावही सेमच होते. सहा जिल्ह्यात एकाच वेळी एक्स-रे टेक्नेशियन म्हणून काम करत होता. उत्तर प्रदेशमधील हा घोटाळा समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या मानव संपदा पोर्टलवर ऑनलाइन पडताळणी मोहिमेदरम्यान हा धक्कादायक घोटाळा उघड झाला. सहा बनावट व्यक्तींची ओळख झाली. सर्वजण एकाच नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख वापरून सहा जिल्ह्यांमध्ये एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून प्रत्येकी 69,595 रुपये मासिक पगार घेत होते. बनावट आधार कार्ड आणि क्लोन केलेल्या नियुक्ती पत्राच्या मदतीने या टोळीने आरोग्य विभागाच्या वेतन यादीतून जवळपास 4.5 कोटी रुपये लंपास केले, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. हा घोटाळा समोर आल्यानंतर योगी सरकारमध्ये खळबळ उडाली असून आरोग्य विभागावर टीका होत आहे.
डॉ. रंजना खरे संचालक (पॅरामेडिकल) यांनी वजीरगंज पोलीस स्टेशनवर तक्रार दाखल केली. बलरामपूर, फर्रुखाबाद, बांदा, रामपूर, अमरोहा आणि शामली येथे नियुक्त केलेल्या बनावट कर्मचाऱ्यांची नावे सांगण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खोट्या व्यक्ती बनून फसवणूक (419), फसवणूक आणि बेकायदेशीरपणे मालमत्ता हस्तांतरण (420), मौल्यवान कागदपत्रांची बनावट (467), फसवणुकीसाठी बनावट (468) आणि बनावट कागदपत्रे खरे म्हणून वापरणे (471) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारावर लोकांनी सरकारची फसवणूक केली. त्यांनी कोट्यवधींचा पगार वसूल करून पसार झाले. त्यांच्या घराला कुलुप लावले आहे. त्यांचे फोनही बंद आहेत. याबाबत सोमवारी एफआयआर दाखल करण्यात आलाय, अशी माहिती उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्याने दिली. पोलिसांकडून या टोळीच्या पद्धतीचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा पॅटर्न तपासत आहे. त्याशिवाय आणखी कुणी अशा प्रकारे सरकारी नोकरीचा लाभ घेत आहे का? याचा तपास केला जात आहे. २०१६ मध्ये यूपी अधीनस्थ सेवा निवड आयोगाने (यूपीएसएसएससी) एक्स-रे तंत्रज्ञ पदांसाठी ४०३ उमेदवारांची निवड केली होती. आग्रा येथील अर्पित सिंग त्यापैकी एक होता. तो ८० क्रमांकावर सूचीबद्ध होता. मात्र, वेळेनुसार, इतर जिल्ह्यांमध्ये आणखी सहा "अर्पित" नावाच्या व्यक्तींनी सेवा जॉईन केली. प्रत्येकाने बनावट आधार तपशील आणि नियुक्ती पत्रे वापरली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.