LPG सिलेंडरचा दर पुन्हा भडकला; 15 दिवसात 50 रुपयांनी वाढ Saam Tv
देश विदेश

LPG सिलेंडरचा दर पुन्हा भडकला; 15 दिवसात 50 रुपयांनी वाढ

एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - घरगुती एलपीजी सिलिंडरच्या LPG Cylinder किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी महागला आहे. आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी सिलिंडर पुन्हा एकदा 25 रुपयांनी महागला आहे. यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ केली होती. आता 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत दिल्लीत 25 रुपयांनी वाढली आहे. या वाढीनंतर आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये इतकी झाली आहे.

हे देखील पहा -

जुलै आणि ऑगस्टमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मे आणि जूनमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. तर एप्रिलमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत या वर्षी जानेवारीमध्ये 694 रुपये होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढवून 719 रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. 15 फेब्रुवारीला किंमत वाढवून 769 रुपये करण्यात आली. यानंतर, 25 फेब्रुवारी रोजी एलपीजी सिलेंडरची किंमत 794 रुपये करण्यात आली. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 819 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

Pune Crime : सासरी येण्यास नकार दिल्याने वाद, पतीने पत्नीवर केला चाकूने हल्ला; गळ्यावर वार झाल्याने महिलेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नागपूरच्या बारमध्येच शासकीय काम; उपविभागीय अभियंत्याची चौकशी सुरू

भाषेवरून लोकसभेतच गदारोळ, निशिकांत दुबेंचा 'हिंदी' हट्ट, पाहा काय घडलं? |VIDEO

Marathi School : आपुल्या घरात हाल सोसते...! मुंबईतील आणखी एक मराठी शाळा बंद होणार

SCROLL FOR NEXT