Woman dance video viral on social media saam tv
देश विदेश

viral Video: बजाओ! आंटीचा नादच खुळा, भन्नाट डान्सचा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह वाह

भन्नाट डान्स करणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

नरेश शेंडे

माणूस वयाने मोठा होत असतो पण त्यांच्या आवडी निवडी आयुष्यभर जीवंत राहतात. नाचायचं म्हटलं तर फक्त गाण्याचे बोल लावा, आम्ही तयारच आहोत, असा ठाम निर्धार करणारी माणसं लोकांचं मनोरंजन करण्यात कमी पडत नाही. दिवसेंदिवस डीजेच्या तालावर भन्नाट डान्स करणाऱ्यांचे (Dance Video) व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

असाच एका आंटीचा भांगड्यावर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक वयोवृद्ध महिला जबरदस्त ठुमके लगावत डान्स करण्याचा मनमुराद आनंद लुटताना या व्हिडिओत दिसत आहे. तरुणांच्या डान्स स्टेप्सही फिक्या पडतील, असा डान्स या महिलेनं केला आहे. (woman dance video viral on social media)

लग्नाची वरात असो वा डीजे पार्टी प्रत्येक ठिकाणी पंजाबी गाण्यांची एक वेगळीच क्रेझ असते. अशातच मनोरंजन करणारा डान्स असेल, तर तो वाऱ्याच्या वेगाप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होतो. असाच एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तु्म्हीही म्हणाल वय फक्त एक नंबर असतो, कारण एक वोयवृद्ध महिला पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स करते. या महिलेचा डान्स पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हा व्हिडिओल rekha.bajaj.796 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओला शेकडो लाईक्स मिळाले असून कमेंट्सचाही वर्षाव करण्यात आला आहे. एका युजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेटं करत म्हटलं, मी या व्हिडिओला एक हजारहून जास्त वेळ पाहिलं आहे. तरीही माझं मन भरलं नाही. तर दुसऱ्या युजरने म्हटलं, त्यांच्या डान्स स्टेप्समध्ये एनर्जी आहे. म्हणूनच त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest Mangalsutra Designs: महिलांसाठी खास फॅन्सी मंगळसूत्र,या 5 डिझाईन्स नक्की आवडतील

Famous Actress : १-२ नाही तब्बल ५ राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी ठरली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, कधीकाळी ३० रुपयांसाठी विकायची कॉफी

Mumbai : मुंबईत महिलेचा दारू पिऊन धिंगाणा, बंदोबस्ताला असलेल्या पोलिसाच्या हाताचा घेतला चावा

UPI New Rules : 15 ऑक्टोबरपासून बदलणार UPIचे नियम, RBI कडून बँकांना महत्त्वाचे आदेश

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

SCROLL FOR NEXT