Odisha health minister, policeman fired
Odisha health minister, policeman fired saam tv
देश विदेश

Odisha Health Minister Dies : ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं निधन; पोलीस कर्मचाऱ्याने केला होता गोळीबार

साम टिव्ही ब्युरो

Odisha Health Minister Dies : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांचा उपचारादरम्यान निधन झालं आहे. ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ जीवघेण्या हल्ला झाला होता. गांधी चौकाजवळ सुरक्षेत तैनात असलेल्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरने त्यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या दास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, नाबा दास यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

ओडिशाचे (Odisha) आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ जिवघेणा हल्ला झाला आहे. गांधी चौकाजवळ एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र,जखमी दास यांचा रुग्णालयात उपचार करताना मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात आता एएसआयच्या पत्नीने माहिती दिली आहे, सकाळी एएसआयने त्याच्या मुलीला व्हिडीओ कॉल केला होता. तो गेल्या अनेक दिवसांपासून घरी देखील गेला नव्हता. त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते अशी देखील माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

पूर्वनियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आरोग्यमंत्री नाबा दास त्यांच्या कारमधून बाहेर पडले. तेव्हा एका एएसआयने त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर बीजेडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. घटनास्थळी कार्यकर्त्यांनी धरणे दिले, त्यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती झाली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, नाबा दास यांच्यावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता असे म्हटले जात आहे. कारण त्यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. विशेष म्हणजे नाबा दास यांना पोलिस संरक्षण देण्यात आलेले असताना हा हल्ला झाला.

दास यांच्यावर गोळीबार करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव गोपाल दास असून तो गांधी चौकात ASI म्हणून तैनात होता. मिळालेल्या माहितीनुसार, एएसआय गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून नाबा दास यांच्यावर गोळीबार केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

SCROLL FOR NEXT