Marriage  Saam Tv
देश विदेश

Odisha News: उतावळा आजोबा, गुडघ्याला बाशिंग...; डॉक्टर-वकील महिलांसह २७ जणींना जाळ्यात अडकवलं अन्...

Lates News: या आजोबाने एक नाही दोन नाही तर तब्बल 27 लग्न केली आहेत. या आजोबांच्या करामती ऐकल्या तर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Odisha Crime News: लग्न म्हटलं की अनेकांना टेन्शन येतं. पण काही लोकं अशी असतात की ज्यांचे अनेक लग्न करुन देखील समाधान होत नाही. भारतात असाच एक आजोबा सापडला आहे जो वयाच्या 66 व्या वर्षी देखील गुडघ्याला बाशिंग बाधून बसला आहे. या आजोबाने एक नाही दोन नाही तर तब्बल 27 लग्न केली आहेत. या आजोबांच्या करामती ऐकल्या तर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.

उतावळ्या आजोबांनी 10 राज्यातील 27 महिलांना आपल्या जाळ्यात अडकवत त्यांच्याशी लग्न केले. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजोबांनी ऐवढी लग्न कशी केली आणि त्यांच्या या पत्नी आहेत तरी कोण? पण त्यांच्या या पत्नींबद्दल ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल कारण आजोबांनी साध्यासुध्या महिलांना नाही तर अगदी डॉक्टर, वकील आणि सरकारी नोकरी करणाऱ्या बडजंग पगाराची नोकरी असलेल्या महिलांना आपल्या प्रेमात वेडं केले आणि त्यांच्याशी लग्न केले. ही गोष्ट फक्त लग्नापर्यंत न थांबता आजोबाने तर या महिलांना लाखोंचा गंडा घातला आहे.

आता हे आजोबा आहे तरी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. तर हे आजोबा ओडिशाचे (Odisha) आहेत. रमेश स्वेन (Ramesh Swain) असे उतावळ्या आजोबाचे नाव असून त्याच्याविरोधात ईडीने (ED) गुन्हा दाखल केला आहे. ईडी या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी आजोबाला चौकशीसाठी रिमांडमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

महत्वाचे म्हणजे, ओडिशा पोलिसांनी (Odisha Police) मागच्या वर्षी या स्वेनला दहा राज्यातील 27 महिलांसोबत लग्न करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली होती. ओडिशा पोलिसांनी या प्रकरणात स्वेनची पत्नी, सावत्र बहीण डॉक्टर कमला सेठी आणि ड्रायव्हरला अटक केली होती. पण या सर्वांना हायकोर्टाने जामीन दिला आहे.

स्वेनने लग्न करुन फक्त महिलांना फसवले नाही तर बँकांना देखील गंडा घातला आहे. स्वेनला 2011 मध्ये हैदराबादच्या लोकांना एमबीबीएम कोर्सच्या जागांच्या बदल्यामध्ये दोन कोटी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्याचसोबत 2006 मध्ये त्याने केरळमधील 13 बँकांना एक कोटी रुपयांचा चूना लावला होता.

८ महिन्यांच्या शोधानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने स्वेनला १३ फेब्रुवारीला अटक केली. त्याच्याविरोधात मे २०२१ मध्ये दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तक्रार दाखल केली होती. स्वेन आणि तिची ओळख २०१८ मध्ये मेट्रोमोनी साइटवरुन झाली होती. त्यावेळी या आजोबाने तो आरोग्य मंत्रालयात उप महानिर्देशक असल्याची खोटी माहिती सांगितली होती.

स्वेनच्या पत्नी या अशिक्षित नाही तर उच्चशिक्षित आहेत. हे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल. या स्वेनने ज्या महिलांशी लग्न केले होते त्या आयटीबीपीच्या असिस्टंट कमांडेंट, चार्टर्ड अकाऊंटंट, डॉक्टर, सुप्रीम कोर्टाच्या वकील, हायकोर्टाच्या वकील आणि केरळ प्रशासनात काम करणात होत्या. स्वेनचे भूवनेश्वरमध्ये तीन भाड्याची घरं होती. त्याठिकाणी तो एकावेळी तीन पत्नींना ठेवायचा. त्याच्या पत्नींनी पोलिसांना सांगितले होते की, तो आपल्या पत्नींकडे अनेकदा उधार पैसे मागायचा. पैसे मिळाल्यानंतर तो दुसऱ्या पत्नीच्या शोधामध्ये जायचा.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Padwa Gift: या दिवाळीत बायकोला करा खूश, या युनिक डिझाईन्सच्या अंगठ्या ठरतील परफेक्ट

Sangli News : पाडव्याच्या मुहूर्तावरील हळदीचा सौदा, प्रति क्विंटल १७,८०० रुपये भाव मिळाला, शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित

Apple Maps Privacy: यूजर्ससाठी प्रायव्हसी धोका! Apple Maps तुमचे लोकेशन ट्रॅक करत आहे, 'ही' सेटिंग लगेच बंद करा

Bigg Boss : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारा नवरा कोण?

Bhau Beej 2025: भावाला ओवाळण्यासाठी उद्या कोणता मुहूर्त सर्वोत्तम? आत्ताच नोट करून ठेवा वेळ

SCROLL FOR NEXT