Odisha train Collision Big Updates  Saam TV
देश विदेश

Odisha Train Accident: मृतदेहांचे फोटो पाहून मनात धास्ती, विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरवली पाठ

विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे.

Ruchika Jadhav

Odisha Train Accident: ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनच्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हळहळला. या अपघातात आतापर्यंत २८८ नागरिकांचा मृत्यू झालाय. अशात ही दुर्घटना घडल्यानंतर मृतदेह एका शाळेत ठेवण्यात आले होते. शाळा १६ जूनपासून सुरु होत आहेत. मात्र विद्यार्थ्यांना याची माहिती मिळाल्याने त्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे. (Marathi News)

बालासोर ट्रेन अपघातानंतर मृतदेह एकत्र एका ठिकाणी नेमके कोठे ठेवावेत असा प्रश्न होता. त्यामुळे पोलिसांनी परिसरात असलेल्या जवळच्या शाळेत मृतदेह एकत्र ठेवले होते. अनेक मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी येथे येत आपल्या व्यक्तीचा मृतदेह घरी नेला. अशात जेव्हा ही घटना घडली तेव्हा अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते. ही दृश्य कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. तसेच काही माध्यमांवर देखील बातमी पाहताना विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत मृतदेह ठेवले असल्याचे पाहिले.

आम्ही शाळेत जाणार नाही

घटनेनंतर आता या शाळेतील सर्व मृतदेह तेथून दुसरीकडे हलवण्यात आलेत. तसेच तो संपूर्ण परिसर स्वच्छ करुन घेण्यात आला आहे. या आधी येथे मृतदेह ठेवण्यात आले होते याबाबत कसल्याही खाणखूणा येथे नाहीत. मात्र टीव्हीवर आणि सोशल मीडियावर आपल्या शाळेत मृतदेह असल्याचे पाहून विद्यार्थी भयभीत झालेत. १६ जून पासून शाळा सुरु होणार असून या विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यास नकार दिला आहे.

धार्मिक पूजेची तयारी

शाळेत कोणतीही नकारात्मक उर्जा राहू नये. अथवा विद्यार्थ्यांच्या मनातील सर्व भीती निघून जावी यासाठी शाळेमध्ये एक मोठी पूजा करणार असल्याचं विरष्ठांनी म्हटलं आहे. मात्र असे असले तरी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती अद्याप कायम आहे.

शाळेची नवी इमारत बांधावी लागणार

या घनेवर मार्ग काढत पोलिसांनी विद्यार्थ्यांचे आई, बाबा आणि शिक्षकांशी चर्चा केली. या चर्चेत असं समजलं की, सदर शाळेची इमारत ही ६५ वर्षे जुनी आहे. त्याजागी नवीन इमारत बांधायला हवी. त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांच्याकडे या बाबत विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT