Crime News Saam tv
देश विदेश

Crime: मुलगा बेपत्ता, कोविडमुळे सुनेचा मृत्यू; ६५ वर्षीय आजीने २०० रुपयांना विकला नातू

Grandmother sells grandson: ओडिशामध्ये एका आजीवर तिच्या ७ वर्षांच्या नातवाला २०० रुपयांना विकल्याचा आरोप आहे. ही घटना ओडिशाच्या मोराडा ब्लॉकमधील बलदिया गावात घडली.

Bhagyashree Kamble

ओडिशामध्ये एका आजीवर तिच्या ७ वर्षांच्या नातवाला २०० रुपयांना विकल्याचा आरोप आहे. ही घटना ओडिशाच्या मोराडा ब्लॉकमधील बलदिया गावात घडली. ६५ वर्षीय विधवा महिला मंद सोरेन यांनी अत्यंत गरिबीमुळे हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

इंडिया टुडेच्या माहितीनुसार, मंद सोरेन यांचे स्वतःचे घर नाही आणि जमीनही नाही. त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. तिचा मुलगा बेपत्ता आहे आणि तिची सून कोरोना व्हायरसमुळे मरण पावली. त्यांना सरकारी मदतही मिळत नाही.

वृद्ध महिला नातवासोबत तिच्या बहिणीच्या घरी राहत होती. सोरेन भिक्षा मागून स्वतःचे आणि तिच्या नातवाचे पोट भरत होती, पण वृद्धापकाळ आणि शारीरिक दुर्बलतेमुळे तिला मुलाची काळजी घेणे कठीण झाले होते. त्यामुळे हताश होऊन वृद्ध महिलेने २०० रुपयांत आपल्या नातवाला विकले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पंचायत समिती सदस्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलाला वाचवले आणि पोळी ठाण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बाल संरक्षण विभाग आणि रसगोविंदपूरचे सीडीपीओ अधिकारीही पोलीस ठाण्यात पोहोचले.

बाल संरक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच आम्ही पोलिस स्टेशन गाठले आणि वृद्ध महिलेशी चर्चा केली. तेव्हा वृद्ध महिला म्हणाली की, मी मुलाला विकले नाही तर माझी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षणासाठी एका जोडप्याला दिले. दरम्यान, स्थानिक लोक सरकारकडे वृद्ध महिलेला पेन्शन आणि घरबांधणीची मदत देण्याची मागणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Maharashtra News Live Update: श्रीरामपूर येथील भोंदू अशोक आढावला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी

Census 2026 : स्व-गणना पूर्ण करणारं कोकणातलं हे गाव पहिलं ठरलं

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार, महागाईचा भडका उडणार? PM मोदींच्या विधानामागे काय आहेत आर्थिक कारणे?

SCROLL FOR NEXT