Odisha Bus Accident News Saam tv
देश विदेश

Accident News : देवदर्शनाला जाताना ४० भाविकांवर काळाचा घाला; घाटात बस उलटून ५ जणांचा मृत्यू, ३५ जण गंभीर जखमी

Odisha Bus Accident News : ओडिशातील नयागढ येथे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५ जण जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • ओडिशात भाविकांच्या बसचा भीषण अपघात

  • ५ जणांचा मृत्यू, ३५ जखमी

  • बस खडकावर आदळून उलटली

  • जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

ओडिशामधून मोठी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री ४० भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या दुर्घटनेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यात दशपल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकराघाटजवळ सदर बसचा अपघात घडला. या बसमधून ४० भाविक प्रवास करत होते. ही खासगी बस बेरहामपूरहून हरी शंकर येथे भाविकांना घेऊन जात होती. टेकराघाटजवळ ही बस अनियंत्रित होऊन एका मोठ्या खडकाळ आदळून उलटली.

हा अपघात इतका भीषण होता की, गाढ झोपेत असलेले भाविक बस बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

बचाव पथके, अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. बचाव पथकाने बसच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. दरम्यान या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. दरम्यान मृत प्रवाशांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 महिन्यानंतर कदाचित LPG बंद होईल; मंत्री छगन भुजबळांची दिल्लीत मोठं वक्तव्य

Maharashtra Live News Update: मद्यधुंद तरुणांकडून दुचाकींची तोडफोड,घटना सीसीटीव्हीत कैद

बाप रे! आकाशातून थेट बुर्ज खलिफावर कोसळली वीज, व्हिडिओ पाहून बसेल धक्का; इमारतीचं नेमकं काय झालं?

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; कुटुंब बुडाले शोकसागरात

Nerul Tourism: कमी गर्दीत फिरायचंय? नेरुळजवळील ‘हे’ 9 सीक्रेट पिकनिक स्पॉट्स ठरतील एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT