Namo Bharat Express obscene video viral : उत्तर प्रदेशमध्ये धावत्या नमो भारत एक्सप्रेसमध्ये ट्रेनच्या सीटवर जोडप्याचा अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. उत्तर प्रदेशमधील मेरठ साउथ स्टेशन आणि दिल्लीमधील साहिबाबाद या दरम्यान धावणाऱ्या नमो मेट्रोमध्येस कपलचा रोमान्स सुरू होता. याचे फोटे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल जाले आहे.
मुलीने एका प्रतिष्ठित शाळेचा गणवेश परिधान केलाला दिसतोय, त्यामुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील असल्याचे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. सीसीटीव्ही फुटेजवरून हा व्हिडिओ २४ नोव्हेंबर रोजीचा असल्याचे बोलले जातेय. हा व्हायरल व्हिडिओ रॅपिड रेल कोचमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्या कोचमध्ये आणखी दोन किंवा तीन प्रवासी स्पष्टपणे दिसत आहेत.
नमो एक्सप्रेसच्या एका सीटवर जोडपे उघडपणे अश्लील कृत्ये करताना कॅमेऱ्यात कैद झालेय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अंदाजे सहा मिनिटांचा असल्याचे सांगितले जातेय. या व्हिडिओमुळे प्रवाशांची सुरक्षितता, नैतिकता आणि सार्वजनिक वाहतुकीच्या शिस्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर राग, संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धक्कादायक म्हणजे, कपलाचा अश्लील व्हिडिओ त्याच ट्रेनमध्ये असणाऱ्या रॅपिड रेल व्यवस्थापनात असणाऱ्या एका कर्मचार्याने व्हायरल केल्याचं बोलले जातेय. रेल्वेकडून यावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही नेटकऱ्यांनी या प्रकरणात रॅपिड रेल प्रशासनाची भूमिका आणि सीसीटीव्ही फुटेजच्या गोपनीयतेवर प्रश्न उपस्थित केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.