NPCI introduces new privacy rules for Google Pay, PhonePe and Paytm users. Saam TV marathi
देश विदेश

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

UPI वापरकर्त्यांसाठी NPCI ने मोठा निर्णय घेतला आहे. Google Pay, PhonePe आणि Paytm व्यवहारांमध्ये आता पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही. DPDP कायद्यानुसार ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत नवीन गोपनीयता नियम लागू होणार आहे.

Namdeo Kumbhar

Google Pay, PhonePe आणि Paytm सारखे UPI अॅप्स वापरणाऱ्या करोडो युजर्सच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेसाठी 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ने (NPCI) एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्यांतर्गत आता UPI ट्रान्सफर किंवा QR कोड स्कॅन करताना समोरच्या व्यक्तीला तुमचा पूर्ण मोबाईल नंबर दिसणार नाही. गूगल पे, फोनपे आणि पेटीएम सारख्या यूपीआय ॲप्स तसेच भागीदार बँकांसाठी एनपीसीआयने परिपत्रक जारी केले आहे.

NPCI ने सर्व बँका आणि UPI अॅप्सना ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत हा नवा नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या नियमांनुसार मोबाईल नंबर, UPI ID आणि बँक खात्याची माहिती 'मास्क' (लपवून) ठेवली जाईल. म्हणजेच समोरच्याला फक्त मोबाईल नंबरचे शेवटीचे ४ अंक दिसतील. महिला युजर्सच्या प्रायव्हसीच्या तक्रारींनंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

एनपीसीआयचा आदेश काय आहे?

अहवालानुसार, यूपीआय युजर्सचा मोबाईल क्रमांक आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी एनपीसीआयने हा नवीन आदेश जारी केला. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे एनपीसीआयकडे याबद्दल तक्रार केली होती. महिलांची गोपनीयता, ओळख आणि सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती.

एनपीसीआयने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, बँका आणि यूपीआय ॲप्सनी वापरकर्त्याच्या गोपनीयतेचा आदर केला पाहिजे. वापरकर्त्याची माहिती, यूपीआय आयडी, मोबाईल क्रमांक आणि खाते क्रमांक, प्रत्येक ग्राहक-दर्शनी इंटरफेसवर लपवली पाहिजे. क्यूआर कोडद्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये वापरकर्त्याच्या मोबाईल क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक दिसले पाहिजेत. पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोबाईल क्रमांक लपवला गेला पाहिजे.

मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही

NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने Paytm, Google Pay आणि PhonePe सारख्या ॲप्सना विशेष आदेश दिले आहेत. आता युजर्सना मोबाईल नंबरऐवजी स्वतःच्या आवडीचे 'युझरनेम' (Username) वापरून UPI ID तयार करता येईल. सध्या बहुतेक लोक मोबाईल नंबरचाच UPI ID म्हणून वापर करतात, कारण त्यांना युझरनेम कसे तयार करायचे हे माहीत नसते.

या नव्या निर्णयामुळे व्यवहारादरम्यान तुमचा मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही. नंबर गुप्त राहिल्यामुळे अनोळखी व्यक्तींकडून येणारे नको असलेले कॉल्स किंवा मेसेज (स्पॅम) थांबतील आणि युजर्सची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित राहील.

याशिवाय, NPCI एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे तुम्ही वेगवेगळ्या ॲप्सवर सेट केलेले सर्व ऑटोमॅटिक पेमेंट्स (Auto-debit) एकाच UPI ॲपमध्ये पाहू शकाल आणि नियंत्रित करू शकाल. यामुळे युजर्स आणि बँक दोघांचाही वेळ वाचेल व व्यवहार अधिक सोपे होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

एसीबीची मोठी कारवाई, BMC च्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, असा रचला सापळा

SCROLL FOR NEXT