Diabetes Vaccine Saam Tv
देश विदेश

Diabetes Vaccine : डायबेटीजचा खात्मा करणारी लस आली? आठवड्यातून एकदाच घ्यावी लागेल इन्सुलिन; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Icodec injection: लाखो लोकांचं टेंशन वाढवणाऱ्या डायबेटीजवर अखेर लस शोधण्यात आलीय. ही लस नेमकी कुणी शोधलीय? ही लस कशी घ्यावी लागणार आहे? त्याबरोबरच ही लस डायबेटीजच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

देशात दर 10 पैकी 1 व्यक्ती डायबेटीसग्रस्त बनलाय. बदलत्या जीवनशैलीमुळे डायबेटिजने नागरिकांना हैराण केलंय. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण डायबेटिजच्या रुग्णांना वरदान ठरणारी लस डेन्मार्कच्या नोवो नॉर्डिक्स कंपनीने तयार केलीय. त्यामुळे रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता दररोज इन्सुलिन किंवा गोळ्यांपासून मुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.

डायबेटीजचा खात्मा करणारी लस?

नोवो नॉर्डिस्ककडून इन्सुलिन आयकोडेक नावाच्या लसीचा शोध लावला आहे. या लसीने शरिरातील इन्सुलिनची निर्मीती वाढेल. या लसीमुळे दररोजच्या इन्सुलिनच्या डोसपासून मुक्ती मिळणार आहे. लसीला युरोपियन मेडिसीन एजन्सीकडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. नोवो नॉर्डिस्कने भारताकडे परवानगी मागितली आहे. लस भारतात आल्यानंतर त्यावर अभ्यास केला जाणार आहे. तज्ज्ञांच्या समितीनं मान्यता दिल्यानंतर भारतात लस उपलब्ध होणार.

भारतातल्या १० टक्के लोकांना डायबेटीजचा आजार असल्याने भारत डायबेटीजची राजधानी बनू पाहतोय. भारतातल्या कोणत्या राज्यात किती रुग्ण आहेत? हे जाऊन घेऊ...

लाखो लोक डायबेटिसच्या जाळ्यात

भारतात 10 कोटीपेक्षा जास्त डायबेटीजचे रुग्ण आहेत. डायबेटीजच्या रुग्णसंख्येत 4 वर्षात 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. गोव्यात 26.4% डायबेटीजग्रस्त आहेत. पाँडिचेरीत 26.3 तर केरळमध्ये 25.5% डायबेटीजचे रुग्ण आहेत. तर उत्तर प्रदेशात प्री-डायबेटिक रुग्णांची संख्या मोठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेशात डायबेटीजचं प्रमाण वेगानं वाढण्याचा अंदाज आहे.

बैठे काम, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड खाण्याचं वाढतं प्रमाण, यामुळे भारतीय लोकांमध्ये डायबेटीजचं प्रमाण वाढलंय. मात्र नोवो नॉर्डिक्स कंपनीच्या लसीमुळे दररोजच्या इन्सुलिन आणि गोळ्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT