North Korea Kim Jong Un Saam
देश विदेश

इकडे इराण-अमेरिका युद्धाला ब्रेक, तिकडे किम जोंगने मिसाइल डागले, कोरियात खळबळ

North Korea missile, Kim Jong Un : इराण-अमेरिका संघर्षाला तात्पुरता ब्रेक मिळाल्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी करत पुन्हा तणाव वाढवला आहे. किम जोंग उन यांच्या या कारवाईमुळे दक्षिण कोरियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Namdeo Kumbhar

North Korea missile launch latest news : इराण आणि अमेरिका यांच्यात मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या युद्धाला आज ब्रेक लागला आहे. १५ दिवसांसाठी इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यात आले आहे. यामुळे जगभरात अनेकांना दिलासा मिळाला, पण दुसरीकडे किम जोंग यांच्या उत्तर कोरियाने टाकलेल्या मिसाइलमुळे दक्षिण कोरियात मात्र खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने पूर्व किनाऱ्यावरून क्षेपणास्त्र डागले, त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये मात्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दक्षिण कोरियन सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने समुद्राच्या दिशेने अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्या आहेत. मागील दोन दिवसांतील ही त्यांची दुसरी क्षेपणास्त्र चाचणी होती.

दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ यांनी या मिसाइलबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, ही क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरील वॉनसान येथून डागण्यात आली होती. प्रत्येक क्षेपणास्त्राने उत्तर कोरियाच्या पूर्व समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने सुमारे २४० किलोमीटर अंतर कापले. अमेरिकेसोबत आमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाच्या कोणत्याही चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.

मंगळवारी उत्तर कोरियाच्या राजधानीजवळील किनाऱ्यावरून एक अज्ञात क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाल्याचे निदर्शनास आले. या प्रक्षेपणाशी संबंधित माहितीचे विश्लेषण दक्षिण कोरियन आणि अमेरिकन गुप्तचर संस्था करत आहे, असे दक्षिण कोरियाच्या लष्कराने सांगितले. दरम्यान, स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार प्रक्षेपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असामान्य हालचाल दाखवली. पण शेवटचे क्षेपणास्त्र दक्षिण कोरियन लष्करी रडारवरून गायब झाले. प्रक्षेपण अयशस्वी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दक्षिण कोरिया हा नेहमीच उत्तर कोरियाचा सर्वात कट्टर शत्रू राहील, असे उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यत आले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्युंग यांनी उत्तर कोरियामध्ये कथित नागरी ड्रोन उड्डाणांबद्दल खेद व्यक्त केला. त्यानंतर किम जोंग उन यांनी सोमवारी रात्री उशिरा त्यांचे कौतुक केले आणि याला अध्यक्षांच्या धैर्याचे आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हटले. पण त्याचबरोबर अशी उड्डाणे पुन्हा झाल्यास उत्तर कोरिया तीव्र प्रत्युत्तर देईल असा इशाराही दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT