Norovirus In India Saam Tv
देश विदेश

Norovirus: भारतात 'नोरोव्हायरस'ची एन्ट्री! शेकडो लोकांची प्रकृती बिघडली, जाणून घ्या लक्षणे

Norovirus In India: महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये झिका आणि चांदीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळले असतानाच आता आरोग्य यंत्रणेचं टेन्शन आणखी वाढलंय. कारण उत्तर कोरीयात उद्रेक झालेल्या नोरोव्हायरसनं भारतात एन्ट्री केली आहे. हैद्राबाद शहरात या विषाणूनं कहर केलाय.

Girish Nikam

देशात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर अनेक आजारांनी डोकं वरती काढलंय. त्यातच 'निपाह', 'चांदीपुरा' आणि 'झिका' व्हायरसनं अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पुण्यात झिकानं तर गुजरातमध्ये चांदीपुरानं टेन्शन वाढवलंय. केंद्र सरकारनं राज्यांना मदत करण्यासाठी विशेष पथकही तयार केलंय. अशा स्थितीतच आता नोरोव्हायरसची भर पडली आहे.

दक्षिण कोरिया नोरोव्हायरसनं हजारो रुग्ण बाधीत आहेत. या विषाणुची आता भारतातही एन्ट्री झालीय. हैदराबादमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळतायेत. विशेष करुन हैदराबादच्या जुन्या परीसरात दररोज शंभरपेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. हा भागात दुषित पाण्याची समस्या आहे. काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

असा आहे नोरोव्हायरस

नोरोव्हायरस हा एक सांसर्गिक विषाणू आहे. ज्याला सामान्यतः 'पोट बग' किंवा 'पोट फ्लू' म्हणून संबोधले जाते. हा विषाणू 1929 पासून वैद्यकीय जगताला ज्ञात आहे. 1968 मध्ये नॉर्वॉक, यूएसए येथे झालेल्या उद्रेकावरून त्याचे नाव देण्यात आले. नोरोव्हायरस कोणत्याही वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो. रोगातून बरा होऊनही नोरोव्हायरसचा रुग्ण अनेक दिवस वाहक असू शकतो. या विषाणूवर कोणतीही थेट लस किंवा औषध सध्या उपलब्ध नाही. नोरोव्हायरस हा सतत बदलणाऱ्या विषाणूंचा समूह आहे.

ही आहेत नोरोव्हायरसची लक्षणे

  • उलट्या होणे

  • थकवा

  • अतिसार

  • मळमळ

  • पोटदुखी

  • डोकेदुखी

  • अंगदुखी

  • ताप

अशी घ्या खबरदारी

नोरोव्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी आपले हात स्वच्छ धुवा. अन्न चांगले शिजवले पाहिजे. कारण नोरोव्हायरस 63 अंश सेल्सिअस तापमानात टिकून राहू शकतो. फळे-भाज्या चांगल्या प्रकारे धुवाव्यात. आजारी लोकांनी स्वयंपाक करणे किंवा इतरांची काळजी घेणे टाळावे. भरपूर स्वच्छ पाणी पिणे हा सर्वोत्तम उपचार आहे.

नोरोव्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी राज्याच्या आरोग्य यंत्रणेनेही खबरदारी घेतली पाहिजे. जनजागृतीवरही भर दिला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे जास्त गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

SCROLL FOR NEXT