Student at Shiv Nadar Univ Shoots Female Classmate Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh Crime News : मुलीला मिठी मारली आणि नंतर गोळी झाडली; नोएडा विद्यापीठात हत्येनंतर आत्महत्या

मुलीला मिठी मारली आणि नंतर गोळी झाडली; नोएडा विद्यापीठात हत्येनंतर आत्महत्या

Satish Kengar

Latest Crime News in Marathi : उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. गुरुवारी येथील शिव नाडर विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्यासोबत शिकत असलेल्या एका मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.

यानंतर त्याने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. हा मुलगा उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील, तर मुलगी कानपूर येथील आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Student at Shiv Nadar Univ Shoots Female Classmate)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी शिव नादर विद्यापीठात बीए समाजशास्त्राच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या अनुजने त्याच्यासोबत शिकणाऱ्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली. तो धानोरा जिल्हा अमरोहा येथील रहिवासी आहे. गोळी झाडण्यापूर्वी अनुजने मुलीला जवळ बोलवलं. तिच्याशी गप्पा मारल्या आणि मिठीही मारली. यानंतर अनुजने पिस्तुलाने तरुणीवर गोळी झाडली. (Latest Marathi News)

जखमी अवस्थेत मुलीला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर अनुजने बॉईज हॉस्टेलच्या ३२८ क्रमांकाच्या खोलीत स्वत:वर गोळी झाडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. दोघांच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली जात आहे. अनुज आणि मृत तरुणी हे एकमेकांचे चांगले मित्र होते, मात्र काही काळापासून दोघांमध्ये वाद सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे. (CRIME NEWS)

अनुजने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. त्यांचे प्रेमसंबंध होते का? हे देखील अद्याप स्पष्ट नाही. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT