देश विदेश

Crime News: बायकोसोबत अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

Noida Crime News: शुक्रवारी रात्री नोएडाच्या फेज ३ परिसरातील गढी चौखंडी गावात, पत्नीशी अवैध संबंध असल्याच्या संशयावरून एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला तत्काळ अटक करून तुरुंगात धाडले.

Dhanshri Shintre

नोएडा फेज ३ पोलिस स्टेशन हद्दीतील गढी चौखंडी गावात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. अवैध संबंधांच्या संशयावरून एका तरुणाची हत्या झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी अमित आणि त्याचा साथीदार उमेश या दोघांना गढी चौकाजवळील सर्व्हिस रोडवरून अटक करून न्यायालयात हजर केले. जिथे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलिसांनी हत्येत वापरलेला चाकू देखील जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित हा अलीगड जिल्ह्यातील नोजलपूर गावचा रहिवासी असून तो गढी चौखंडी गावातील गल्ली क्रमांक नऊमधील एका खोलीत पत्नी आणि तीन मुलांसह भाड्याने राहत होता. त्याच परिसरात रबुपुरा येथील रहिवासी राहुल देखील शेजारी राहत होता. राहुलची पत्नी आणि मुले रबुपुरामध्येच राहत असल्यामुळे तो एकटाच नोएडामध्ये भाड्याने राहत होता. अमितची पत्नी आणि राहुल दोघेही एकाच कारखान्यात सफाई कामगार म्हणून काम करत होते, तर अमित त्याचा मित्र उमेशसोबत इतरत्र कारखान्यात काम करत होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल अनेकदा अमितच्या घरी ये-जा करत असे आणि जेवणही करत असे. शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन अमितच्या घरी आला आणि गोंधळ घालू लागला. त्यावेळी अमितचा मुलगा व शेजाऱ्यांनी त्याला बाहेर हाकलून लावले. अमित आणि त्याची पत्नी बाजारात गेले असता त्यांनी घराला कुलूप लावले होते. परत आल्यानंतर त्यांनी राहुलला पुन्हा गेटवर गोंधळ करताना पाहिले आणि तो संधी साधून घरात पुन्हा घुसला.

त्या वेळी अमितने उमेशसोबत मिळून राहुलच्या मानेवर चाकूने वार करून त्याची हत्या केली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळल्याने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून राहुलला रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सेंट्रल नोएडा झोनचे डीसीपी शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, अमितला राहुलचा त्याच्या पत्नीशी अवैध संबंध असल्याचा संशय होता आणि या संशयातून त्याने मित्र उमेशच्या मदतीने ही हत्या केली. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ayurvedic Kadha Recipe : हिवाळ्यात सर्दी - खोकल्यापासून राहाल दूर, रोज प्या 'हा' आयुर्वेदिक काढा

Gratuity Calculation: पगार ₹५०,०००... तर १, २, ३ आणि ४ वर्षानंतर किती ग्रॅच्युटी मिळणार? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

Blood Pressure Impact: नॉर्मल ब्लड प्रेशर असूनही येऊ शकतो हार्ट अटॅक? धडकी भरवणारा संशोधनाचा दावा समोर!

Maharashtra Live News Update : लोणावळा रेल्वे मार्गावर १० दिवस ब्लॉक

Maharashtra politics : चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

SCROLL FOR NEXT