Noida Crime News Saam tv
देश विदेश

Noida Crime News: किती रेट घेशील, २ तरूणांनी कॅबची वाट बघणाऱ्या महिला पत्रकाराला छेडलं, सोशल मीडियावर सांगितला भयंकर अनुभव

Noida Police: नोएडामध्ये एका महिला पत्रकारासोबत तरुणांनी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या महिला पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्यासोबत घडलेला प्रकार शेअर केला होता.

Priya More

कोलकातामधील डॉक्टर महिलेवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशामध्ये संतापाचे वातावरण आहे. अशामध्येच नोएडामध्ये एका महिला पत्रकारासोबत तरुणांनी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या महिला पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्यासोबत घडलेला प्रकार शेअर केला होता. त्यानंतर नोएडा पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत छेडछाड करणाऱ्या तरुणांना अवघ्या काही तासांत अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री डीएलएफ मॉल ऑफ इंडियाच्या बाहेर ही घटना घडली. महिला पत्रकार सेक्टर-१६ मधील एका मीडिया हाऊसमध्ये काम करते. ती बुधवारी रात्री कामावरून घरी जाण्यासाठी निघाली. डीएलएफ मॉल ऑफ इंडियाच्या बाहेर ती कॅबची वाट पाहत होते. त्यावेळी बाइकवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने या महिला पत्रकाराला हातवारे करून 'किती पैसे घेशील' असे विचारले. त्यानंतर हे दोघेही घटनास्थळावरून वेगाने बाइक चालवत फरार झाले. सुदैवाने या महिला पत्रकारासोबत काही झाले नाही ती घरी व्यवस्थित पोहचली.

घरी पोहचल्यानंतर या महिला पत्रकाराने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. त्यानंतर नोएडा पोलिसांनी तात्काळ या पोस्टची दखल घेतली. पोलिसांनी या महिला पत्रकाराला संपर्क करत तक्रार दाखल करण्यास सांगितले. महिला पत्रकाराने नोएडाच्या सेक्टर २० पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत २४ तासांच्या आत या तरुणांना अटक केली. अश्वत पाल (२५ वर्षे) आणि विपीन सिंह (२७ वर्षे) अशी या तरुणांची नावं आहेत. पोलिसांनी आरोपींची बाइक देखील ताब्यात घेतली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आम्ही ही घटना घडली त्या सेक्टर १८ मधील मॉल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतेल. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपींपर्यंत पोहचलो. सीसीटीव्ही स्कॅन करून आरोपींच्या बाइकचा नंबर ट्रेस केला. त्यानंतर या प्रकरणाच्या २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली.' पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात ७५ (२) अंतर्गत लैंगिक छळाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आणि अटक केली. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News : मान्सून गोव्यात दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान खात्याचा ताजा अंदाज आला समोर

Pune Crime: पुण्यात रक्तरंजित थरार! विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची हत्या, झोपेत असताना चाकूने सपासप वार करत संपवलं

एकही पिंपल दिसणार नाही! चमकदार त्वचेसाठी आजच बदला 'या' ५ वाईट सवयी

Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

SCROLL FOR NEXT